Valpoi : पणशे सत्तरी येथील श्री. शांतादुर्गा देवस्थानचा पंधरावा वर्धापन दिवस 13 व 14 एप्रिल रोजी उत्साहपूर्ण वातावरणात झाला. शुक्रवारी पणशेतील ओम श्री साई स्वयं सहाय्य गटाने सादर केलेला लोकमांड उत्सव रात्री दर्दी लोकांच्या उपस्थितीत थाटात झाला.
यामध्ये महाभारत, समई नृत्य, देवी मातेवर आधारित नृत्य, असे विविध लोककला प्रकार महिलांनी अगदी तन मन अर्पण करून सादर केले, त्यामुळे हा कलाविष्कार उपस्थित रसिकांना भावला. पार्श्व संगीतातून सर्व महिला, युवतींच्या पथकाने अभिनयाव्दारे हुबेहूब ‘महाभारत’ रसिकांपुढे उभे केले. व तो काळ जसाचा तसा रंगमंचावर अवतरल्याचे दिसून आले. हे महानाट्य नीता नंदा पणशीकर यांनी बसविले होते.
समई नृत्य, वेशभूषा यांचा कलाविष्कार देखणा होता. 13 रोजी रात्री 10 वाजता लोकमांड सादर झाला. कलावष्काराचे सूत्रनिवेदन नीलेश पणशीकर यांनी केले. श्री. शांतादुर्गा देवस्थान कार्यकारी मंडळ पणशे सत्तरीचे अध्यक्ष रामनाथ पणशीकर म्हणाले, पोर्तुगीजांच्या राजवटीपासून हे मंदिर गावात आहे. त्यावेळी लहान स्वरूपात होते. पणशे गावचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र येऊन उत्सव साजरा करतात. 2008 साली मंदिराची चौगुले या खनिज कंपनीने नव्याने बांधणी केली,त्यानंतर पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली.
देवस्थानचे उपाध्यक्ष सुभाष पणशीकर, सचिव सुरज सावईकर, सहसचिव नामदेव पणशीकर, खजिनदार लक्ष्मण गावडे, सहखजिनदार विजय कुमार देसाई, सदस्य नागू पणशीकर, कृष्णा पणशीकर, पांडुरंग पणशीकर, रमेश पणशीकर, सदा गावडे, सागर गावडे, रुपेश गावडे, प्रमोद केरकर, काशीनाथ शिंगणीकर असे विविध पदाधिकारी सदस्य कार्यरत आहेत, असे पणशीकर म्हणाले.
दरवर्षी होतात विविध सोहळे
दरवर्षी नोव्हेंबरमध्ये दिवजोत्सव होतो. तसेच कालोत्सव, शिगमोत्सव, पाच दिवस होळी, खडकपाषाण पूजा, राखण ठेवण्याची परंपरा, उपार, वाडवळ, कुळागरात ब्राह्मण भोजन, श्रावण, नवरात्रात भजन, कीर्तन असे विविध कार्यक्रम दरवर्षी होतात. देवस्थानचे पाच गावकर व पुजारी अशी रचना आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.