Redighat: रेडीघाट बनलाय 'अपघात घाट', तातडीने उपाययोजनांची मागणी; संरक्षक कुंपण, रस्ता रुंदीकरणाची गरज

Redighat Valpoi accident zone: वाळपई–होंडा मार्गावरील रेडीघाटात अपघातांचे प्रमाण वाढत असून हा घाट आता ‘अपघात घाट’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
Redighat Valpoi accident zone
Redighat Valpoi accident zoneDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: वाळपई–होंडा मार्गावरील रेडीघाटात अपघातांचे प्रमाण वाढत असून हा घाट आता ‘अपघात घाट’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. गेल्या आठवड्यात सलग दोन दिवसांत तीन मोठे अपघात घडले. सुदैवाने जीवितहानी टळली असली, तरी अपघातांची तीव्रता पाहता परिस्थिती धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या घाटातून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा होत असते. पणजीकडे जाणारा हा मुख्य मार्ग असून रस्त्याच्या कडेला मोठी जंगली झाडे उभी आहेत. ही झाडे हटविणे किंवा किमान छाटणी करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. स्थानिक नागरिक विश्वेश प्रभू यांनी सांगितले की, चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. मात्र, रेडीघाटात भरधाव वाहनांमुळे अपघातांची शक्यता वाढत आहे.

Redighat Valpoi accident zone
Goa Taxi Issue: दक्षिण गोव्यात स्थानिक टॅक्सीचालक आक्रमक, ऑनलाईन टॅक्सीसेवेला तीव्र विरोध; पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन

दरम्यान, ब्रम्हाकरमळी येथील ॲड. शिवाजी देसाई यांनी सांगितले की, वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. वाळपईकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग तयार करणे, तसेच धोकादायक वळणांचे विस्तार करणे आवश्यक आहे. रेडीघाट परिसर जंगल क्षेत्रात येत असल्याने रस्ता रुंदीकरणासाठी वन खात्याची परवानगी आवश्यक ठरणार आहे.

Redighat Valpoi accident zone
Goa Marine Export: सागरी निर्यातीत घट, महसुलात वाढ; गोव्यात निर्यातीला मोठा फटका, दरवाढीमुळे एकूण उत्पन्नात वाढ

त्यामुळे शासनाने तातडीने सर्वेक्षण करून वाळपई–नागवे ते भुईपाल दरम्यान दोन पदरी रस्ता उभारण्यासाठी कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

सीसीटीव्ही, गतिरोधकांची गरज

घाटात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून वेगमर्यादा काटेकोरपणे लागू करावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. धोकादायक वळणांवर गतीरोधक बसविणे, वेगमर्यादा व इशारा फलक लावणे, तसेच दरीलगतच्या भागात संरक्षक भिंती उभारणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com