Goa Police : वाळपईचे निरीक्षक प्रज्योत फडते निलंबित; लैंगिक अत्याचाराची दखल न घेतल्याने कारवाई

पोलिस निरीक्षकावरील कारवाई योग्य : मुख्यमंत्री
Crime
CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

सत्तरीतील एका अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीची दखल घेण्यास विलंब केल्याच्या आरोपावरून वाळपईचे पोलिस निरीक्षक प्रज्योत फडते यांना निलंबित करण्यात आले. याची तक्रार मुलीच्या पालकांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे केली होती. याची दखल घेत आज फडते यांच्या निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला.

दहा दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचे अश्‍लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तसेच धमकी देऊन लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार वाळपई पोलिसांत पालकांनी केली होती. त्यात 15 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले होते.

Crime
Goa Cabinet Reshuffle : मंत्रिमंडळ बदलात 'या' मंत्र्याचा पत्ता कट होणार?

कारवाई केली पण

याप्रकरणी वाळपई पोलिसांनी पर्ये येथील कृष्णा राणे (वय 24 वर्षे) या तरुणाला अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याला पोलिस कोठडी बजावली होती. मात्र, मुलीच्या पालकांनी, वाळपई पोलिसांनी तक्रार घेण्यास बिलंब केल्याची तक्रार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे केल्यामुळे आज प्रज्योत फडते यांना निलंबित करण्यात आले.

"महिलांची सुरक्षा महत्त्वाची असून अशा प्रकारे गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठीशी घालणाऱ्यांची गय केली जाणार नाही. मग तो कितीही मोठा अधिकारी असू दे. या प्रकरणात पोलिस निरीक्षकावरील कारवाई योग्य आहे."

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Crime Branch Investigation
Goa Crime
Bombay High Court Goa Bench Judgment
Goan Youth Child Abuse UK
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com