Valpoi Campaign : पर्यावरण रक्षणासाठी ब्रह्माकरमळीत स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण उपक्रम

ग्रामस्थांचाही सहभाग : वनविभाग, लाईफ जीवनशैली यांचे आयोजन
Valpoi Cleanliness Campaign
Valpoi Cleanliness CampaignGomantak Digital Team
Published on
Updated on

वाळपई : वाळपई वनविभाग आणि ब्रह्माकरमळी ग्रामस्थांनी एकत्र येऊन पर्यावरणपूरक उपक्रमासाठी लाईफ जीवनशैलीअंतर्गत स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण उपक्रम राबविला. यावेळी वनविभागाने ब्रह्माकरमळी ग्रामस्थांच्या सहकार्याने ब्रह्मदेव मंदिराजवळील ब्रह्माकरमळी झरा येथे स्वच्छता व वृक्षारोपण केले. यावेळी मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करण्यात आला.

हा उपक्रम पर्यावरण रक्षणासाठी लाईफ जीवनशैलीचा एक भाग आहे. ज्याचा उद्देश अशा जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आहे, जी संसाधनांच्या सजग आणि जाणीवपूर्वक वापरावर लक्ष केंद्रित करते आणि सध्याच्या ‘वापर आणि विल्हेवाट लावण्याच्या’ सवयी बदलण्याचे उद्दिष्ट ठेवते.

Valpoi Cleanliness Campaign
Valpoi News: 'उद्योग योजनेतून आत्मनिर्भरतेकडे...' वाणिज्य खात्याची वाळपईत कार्यशाळा

भावी पिढ्यांसाठी गरजेचे

पर्यावरणीय पुढाकारासाठी लाईफ जीवनशैली हे आपल्या घरासाठी अधिक टिकाऊ भविष्य निर्माण करण्याच्या दिशेने एक उत्कृष्ट पाऊल आहे. हे लोकांना पर्यावरणावरील त्यांच्या प्रभावाची जाणीव ठेवण्यास आणि त्यांच्या कृतींसाठी जबाबदारी घेण्यास प्रोत्साहित करते. अशा उपक्रमांना चालना देऊन आपण स्वतःसाठी आणि भावी पिढ्यांसाठी एक चांगले आणि स्वच्छ जग निर्माण करू शकतो, असे श्याम केरकर यांनी सांगितले.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश हा आहे की, व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन जीवनातील साधे बदल स्वीकारण्यास प्रोत्साहित करणे, जे हवामान बदलास हातभार लावू शकतात. वाळपई वनविभाग आणि ब्रह्माकरमळी ग्रामस्थांनी या परिसरात औषधी वनस्पती लावण्यासाठी पुढाकार घेतला, ज्यामुळे परिसर सुशोभीत होण्यास मदत होईलच शिवाय आरोग्यदायी पर्यावरणाला प्रोत्साहन मिळेल.ब्रह्माकरमळीतील ग्रामस्थांनी या उपक्रमात अगदी उत्साहाने सहभाग घेतला.

Valpoi Cleanliness Campaign
Valpoi News: वाळपई रेडीघाटात अपघात सत्र सुरूच

लोकांना पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्यासाठी प्रोत्साहित करून पर्यावरणात सकारात्मक बदल घडवून आणणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. हा उपक्रम लोकांना प्रेरित करेल.

- दत्तराज शिरोडकर, वाळपई वनविभागाचे प्रवक्ते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com