Valpoi News : उत्पादन क्षेत्रात टाकणार पाऊल; वासुदेव परब यांची माहिती

Vasudev Parab : जीवन विमाच्या बाबतीतही विचार केला असून कोटक महिंद्रा या कंपनिशी करार केला आहे. ज्यातून जीवन विमा, वाहन विमा केला जाईल.
goa
goaDainik Gomantka
Published on
Updated on

वाळपई ,पारदर्शक कामाचे फळ म्हणून सोसायटीला बहुउद्देशीय असा दर्जा मिळाला आहे. म्हणूनच याचा फायदा सभासदांना, लोकांना होण्यासाठी सोसायटी विविध उपक्रम हाती घेणार आहे.

येणाऱ्या काळात उत्पादन क्षेत्रात पाऊल टाकणार असल्याची माहिती वाळपई येथील सत्तरी बहुउद्देशीय (मल्टिपर्पज) को.ऑप. सोसायटीचे अध्यक्ष वासुदेव परब यांनी दिली आहे.

वाळपईच्या मुख्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष कृष्णा गावस, संचालक ॲड. काशिनाथ म्हाळशेकर, प्रेमनाथ हजारे, म्हाळू गावस, श्रीपाद सावंत, गोविंद कोरगावकर, नितीन शिवडेकर, व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मण गावस, व्यवस्थापक अनंत गावस यांची उपस्थिती होती. यावेळी वार्षिक अहवालाचे अनावरण करण्यात आले.

परब म्हणाले की, उत्पादन क्षेत्रात जाताना ड्राय फ्रूट, होलसेल मेडिकल अशा विविध माध्यमातून व्यवसायाचा विचार करणार आहोत. सभासदांना फायदा होईल तेच धोरण अवलंबिले जाईल.

जीवन विमाच्या बाबतीतही विचार केला असून कोटक महिंद्रा या कंपनिशी करार केला आहे. ज्यातून जीवन विमा, वाहन विमा केला जाईल. या विम्याच्या माध्यमातून दरवर्षी साधारण पन्नास लाख रुपयांचा व्यवसाय होईल, हे उद्दिष्ट ठेवले आहे. सोसायटीने होंडा, हरवळे येथे काही जमीनही खरेदी केलेली आहे. पेडणे, पणजी येथे नवीन शाखा सुरू करण्याचा मनोदय आहे. विश्वासाच्या जोरावरच सोसायटीने अर्बन ते बहुउद्देशीय, अशी मजल मारलेली आहे.

कर्जाचा नियमित परतावा

गतवर्षी २ कोटी ६९ कोटींचा नफा झालेला आहे. सभासदांना दिलेल्या कर्जाचा नियमित परतावा होत असून सोसायटीच्या प्रगतीसाठी संचालक झटत आहेत. बहुउद्देशीय दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच वातानुकूलीत ३२ आसन क्षमतेची बस खरेदी केली व ही बस गोवा दर्शन, तीर्थक्षेत्र दर्शनासाठी लोक वापरतात. त्यातून फायदा होतो आहे, असे वासुदेव परब यांनी सांगितले.

४ ऑगस्टला वार्षिक सभा

रविवार, ४ ऑगस्ट रोजी सोसायटीची वार्षिक सभा लक्ष्मीबाई मेमोरियल सभामंडप वाळपई येथे सकाळी १० वा. आयोजित केली आहे. सभासदांनी सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

सत्तरी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कल्पेश गावस व अखिल गोवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उदय सावंत यांची निवड झाल्याबद्दल संचालक म्हाळू गावस यांनी संचालकांच्या वतीने ठराव मांडून अभिनंदन केले.

goa
क्विक कॉमर्स कंपनी Zepto चा जलवा; एका वर्षात महसूलात तब्बल ‘एवढ्या’ टक्क्यांची वाढ; आता उभारणार 665 मिलियनचे भाग भांडवल!

वाळपई येथे १९९६ साली समविचारी नागरिकांनी एकत्र येऊन सत्तरी अर्बन को.ऑप. सोसायटीची स्थापना केली. सोसायटीच्या प्रगतीसाठी सर्वांनी मेहनत घेऊन सहकार क्षेत्रात काम केले. लोकोपयोगी उपक्रम राबवून राज्यभर १३ शाखा सुरू केल्या.

- वासुदेव परब, अध्यक्ष,

सत्तरी बहुउद्देशीय को.ऑप. सोसायटी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com