क्विक कॉमर्स कंपनी Zepto चा जलवा; एका वर्षात महसूलात तब्बल ‘एवढ्या’ टक्क्यांची वाढ; आता उभारणार 665 मिलियनचे भाग भांडवल!

Zepto Series F Round Fundraising: क्विक कॉमर्स कंपनी Zepto ने विद्यमान आणि नवीन गुंतवणूकदारांकडून $665 दशलक्ष भांडवल उभारण्याचा निर्णय घेतला.
Zepto Series F Round Fundraising
Zepto Series F Round FundraisingDainik Gomantak
Published on
Updated on

Zepto Series F Round Fundraising: क्विक कॉमर्स कंपनी Zepto ने विद्यमान आणि नवीन गुंतवणूकदारांकडून $665 दशलक्ष भांडवल उभारण्याचा निर्णय घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एवढा पैसा उभारल्यानंतर कंपनीचे व्हॅल्यूएशन $1.4 अब्ज वरुन $3.6 अब्ज झाले. या फंड राऊंडचे नेतृत्व विद्यमान गुंतवणूकदार स्टेपस्टोन ग्रुप (StepStone Group), नेक्सस व्हेंचर पार्टनर्स (Nexus Venture Partners), ग्लेड ब्रूक कॅपिटल (Glade Brook Capital), गुडवॉटर आणि लॅची ग्रूम (Lachy Groom) यांनी केले. त्याचवेळी, नवीन गुंतवणूकदार Avenir Growth, Lightspeed Venture Partners आणि Avra ​​देखील या फंडरेज सामीलमध्ये झाले.

IPO च्या आधी Zepto च्या निधी उभारणीचा उद्देश काय आहे?

दरम्यान, हा फंडरेज अशावेळी करण्यात आला आहे की, Zepto 12-15 महिन्यांत IPO आणण्याची तयारी करत आहे आणि पब्लिक लिस्टिंगपूर्वी प्रॉफिटेबल बनण्याची योजना आखत आहे. झेप्टोचे सह-संस्थापक आणि सीईओ आदित पालिचा म्हणाले की, “बँकेत असलेल्या रोख रकमेमुळे आम्ही आधीच चांगल्या स्थितीत आहोत. आगामी IPO च्या आधी बॅलन्स शीटमुळे आम्ही मजबूत स्थितीत आहोत. बँकेत ही रोकड असल्याने आम्हाला मोठ्या प्रमाणावर IPO लाँच करता येतो."

Zepto Series F Round Fundraising
Tata: टाटाची कमाल! गुंतवणूकदारांनी 5 दिवसांत छापले 80000 कोटी; Reliacne नेही दाखवला जलवा

Zepto चे ग्रॉस मर्केंडाइज वॅल्यू (GMV) वर्ष-दर-वर्ष (YoY) $1 बिलियन पेक्षा जास्त झाले आहे आणि कंपनीचे सुमारे 75 टक्के स्टोअर मे 2024 पर्यंत पूर्णपणे EBITDA सकारात्मक आहेत. पूर्वी 23 महिन्यांत प्रॉफिट देणारी ही स्टोअर्स आता अवघ्या सहा महिन्यांत प्रॉफिटेबल ठरत असल्याचे पालीचा यांनी सांगितले.

“स्टोअर्सच्या या गतिमानतेने अधिकाधिक प्रॉफिटेबल होत जाण्याने झेप्टोला झपाट्याने विस्तार करण्यास सक्षम केले आहे,” असेही पालिचा म्हणाले. पालिचा पुढे म्हणाले की, आम्ही 350 स्टोअर्सवरुन 700 स्टोअर्सपर्यंत पोहोचलो आहोत. कंपनीच्या विस्तारासाठी पुन्हा एकदा मोठे भागभांडवल उभारण्याचा आमचा विचार आहे.’’

कंपनी सध्या भारतातील (India) पहिल्या दहा शहरांमध्ये सुमारे 350 डार्कस्टोअर्स चालवत आहे आणि आणखी दहा शहरांमध्ये विस्तार करण्याची योजना आखत आहे.

Zepto Series F Round Fundraising
Tata Group: टाटा समूहात नोकरीची संधी; 72,000 जणांना मिळणार रोजगार

झेप्टोचा दहा महिन्यांतील दुसरा सर्वात मोठा निधी संकलन

झेप्टोचा हा दहा महिन्यांतील दुसरा मोठा टिकट फंडरेज आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, Zepto ने $235 दशलक्ष ($235 दशलक्ष) सिरीज E फंडिंग राऊंडमध्ये $1.4 बिलियनच्या व्हॅल्यूएशनमध्ये उभारले होते, ज्यामुळे ते युनिकॉर्न बनले होते. या राऊंडचे नेतृत्व स्टेपस्टोन ग्रुपने केले होते, जे विद्यमान गुंतवणूकदार नेक्सस व्हेंचर पार्टनर्सचे संयुक्त पार्टनर (LP) देखील आहे. Zepto ने यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये $60 दशलक्ष उभारले होते. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये वाय कॉम्बिनेटर-बॅक्ड स्टार्टअपने $900 दशलक्ष व्हॅल्यूएशनवर $100 दशलक्ष आणि मे 2022 मध्ये $200 दशलक्ष उभारले होते.

Zepto Series F Round Fundraising
Tata Group: बस नाम ही काफी है! टाटा समूहाचं मार्केट कॅप पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा अधिक

झेप्टोची आर्थिक कामगिरी कशी होती?

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे दाखल केल्यानुसार, झेप्टोचा ऑपरेशन्समधील महसूल मागील वर्षी (FY22) 140.7 कोटी रुपयांवरुन 2022-23 (FY23) आर्थिक वर्षात 14 पटीने वाढून 2,024 कोटी रुपये झाला. दरम्यान, मुंबईस्थित (Mumbai) स्टार्टअपचा तोटा गतवर्षीच्या 390.3 कोटी रुपयांच्या तुलनेत तिपटीने वाढून 1,272 कोटी रुपये झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com