Illegal club Goa: वागातोरमधील प्रसिद्ध 'कॅफे CO2' चे शटर डाऊन! 250 आसनक्षमतेचा क्लब बेकायदेशीर

Cafe CO2 shut down Goa: वागातोर येथील ओझ्रान्त क्लिफवरील प्रसिद्ध 'कॅफे CO2' क्लबला सील ठोकण्यात आलेय
Cafe CO2 Goa
Cafe CO2 GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Vagator club shutdown: गोव्यात 'बर्च बाय रोमिओ लेन' (Birch by Romeo Lane) नाईट क्लबमधील भीषण अग्नितांडवाच्या घटनेनंतर (६ डिसेंबर) राज्य सरकारने बेकायदेशीर क्लबवर कारवाईचा धडाका लावला आहे. याच पार्श्वभूमीवर, वागातोर येथील ओझ्रान्त क्लिफवरील (Ozrant Cliff) प्रसिद्ध 'कॅफे CO2' (Café CO2) क्लबला सील ठोकण्यात आलेय.

फायर NOC आणि सुरक्षा प्रमाणपत्रांचे उल्लंघन

'कॅफे CO2' क्लबला संयुक्त अंमलबजावणी निरीक्षण समितीने (Joint Enforcement Monitoring Committee) सील केले आहे. २५० आसनक्षमताअसलेल्या या क्लबकडे अग्निशमन विभागाचे अनिवार्य ना हरकत प्रमाणपत्र नव्हते. क्लबमध्ये संरचनात्मक सुरक्षेच्या त्रुटी आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

Cafe CO2 Goa
Goa Nightclub Fire: बोगस कागदपत्रांद्वारे परवाने दिले कसे? समितीतर्फे तपास सुरू; लुथरा बंधूंचे मंगळवारी भारतात प्रत्यार्पण शक्य

'रोमिओ लेन' अग्नितांडवाचा परिणाम

'रोमिओ लेन' अग्नितांडवानंतर गोवा सरकारने बेकायदेशीर आस्थापनांवर कारवाई तीव्र केली आहे. काही दिवसांपूर्वी हडफडे येथील 'रोमिओ लेन' क्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ लोकांचा मृत्यू झाला होता आणि ५० हून अधिक जखमी झाले होते. या तपासात 'रोमिओ लेन' क्लब १८ महिन्यांपासून बेकायदेशीरपणे आणि परवाना नसताना चालत होता, असे उघड झाले होते.

मालक सौरभ आणि गौरव लुथरा थायलंडला पळून गेले, तर स्थानिक सरपंचासह अनेकांना अटक झाली. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यभरातील बेकायदेशीर क्लबचे लेखापरीक्षण आणि पाडण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी म्हणून 'कॅफे CO2' वर कारवाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या क्लबवर यापुढेही कारवाई सुरूच राहील, असा इशारा सरकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com