Vagator Car Stuck: वागातोरमध्ये रस्त्यात आडवी अडकली अलिशान कार; आठवडा उलटूनही कार तिथेच, रस्ता अजुनही ब्लॉक...

वागातोरमधील प्रकार; पश्चिम बंगालचा कारमालक परतलाच नाही...
Vagator Car Stuck
Vagator Car StuckDainik Gomantak
Published on
Updated on

Vagator Car Stuck: उत्तर गोव्यातील वागातोर येथून एक विचित्र प्रकार समोर आलेला आहे. यात एका पश्चिम बंगालमधील पर्यटकाची अलिशान कार रस्त्यावरील दोन्ही बाजूकडील कम्पाऊंड भिंतींमध्ये अडकून बसल्याचा प्रकार घडला आहे.

ही कार पश्चिम बंगालमध्ये नोंद असलेली आहे. या मार्गावर कार आल्यानंतर यू टर्न घेताना हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. हे पर्यटक देखील पश्चिम बंगालमधील असल्याचेच सांगितले जात आहे.

Vagator Car Stuck
Goa Beach Parties: गोव्याची किनारपट्टी बनतेय 'पार्टी झोन'; रात्रीपासून पहाटेपर्यंत झिंग, स्थानिकांची उडाली झोप...

आधी या कारचालकाने या रस्त्यावर गाडी घातली. पण थोड्या वेळाने रस्ता चुकल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे पुन्हा यु टर्न घेण्याचा निर्णय घेऊन त्याने यु टर्नसाठी गाडी वळविण्यास सुरवात केली. तथापि, हा रस्ता अरूंद होता.

तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला कंम्पाऊंड भिंत आहे. गाडी वळवताना एक वेळ अशी आली की ही कार पूर्णपणे या दोन्ही बाजूंच्या कंम्पाऊंड भिंतींमध्ये अडकून बसली.

त्यामुळे गाडीची पुढची बाजू आणि मागची बाजू देखील आता भिंतीला घासली आहे. त्यामुळे ती कार तर अडकलीच आहे, पण हा रस्ताही ब्लॉक झाला आहे.

Vagator Car Stuck
Mopa Airport: ब्रिटनच्या गॅटविक आणि मँचेस्टर विमानतळावरून 'मोपा'वर आठवड्याला दोन चार्टर उड्डाणे...

यावेळी झालेल्या मोठ्या आवाजाने अनेकजण घटनास्थळी जमा झाले. रात्र होऊ लागल्याने येथील रहिवाशांनी संबंधित पर्यटकांना ही गाडी आज राहू द्यावी आणि उद्या घेऊन जावी, असे सांगितले. तथापि, जवळपास आठवडा उलटून गेला आहे तरीही ही गाडी घेऊन जाण्यासाठी कारमालक कुणीही आलेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com