Vagator: वागातोर किनाऱ्यावरील खासगी जागा परप्रांतीयाकडून बळकावण्याचा प्रयत्न, कायदेशीर मार्गाने जमीन ताब्यात घेणार; लोबोंचा दावा

Michael Lobo: कुटुंबीयांच्या असाहाय्यतेचा फायदा घेत ती जागा हडप करण्याचा प्रयत्न केला असल्याचे यावेळी आमदार लोबो यांनी सांगितले.
Michael Lobo
Michael Lobo Dainik Gomantak
Published on
Updated on

Vagator Beach Land Dispute

कळंगुट: वागातोर येथील समुद्र किनाऱ्यालगतची खासगी जागेचा ताबा महम्मद हुसैन शेख या परप्रांतीयाने बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळविल्याचा दावा करीत रविवारी सकाळी आमदार मायकल लोबो यांनी स्थानिकांसमवेत या जागेची पाहणी केली. यावेळी शेख यांनी ही जमीन पूर्णपणे उखडून टाकण्यात आल्याचे दिसून आले.

आपल्या जवळच्या कुटुंबीयांच्या मालकीची ती जमीन असून शेख यांनी या कुटुंबीयांच्या असाहाय्यतेचा फायदा घेत ती जागा हडप करण्याचा प्रयत्न केला असल्याचे यावेळी आमदार लोबो यांनी सांगितले. गैरमार्गाने बळकावण्यात आलेली जागा कायदेशीर मार्गाने परत मिळवून पूर्ववत करून संरक्षक भिंत उभारून देण्याचे आश्वासन यावेळी लोबो यांनी दिले.

यावेळी या भागातील सामाजिक कार्यकर्ते रवी हरमलकर, पार्वती नागवेकर, गोविंद धारगळकर, ज्यीवीश थॉमस फर्नांडिस, मॅक्सी डिसोझा अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Michael Lobo
Vagator: वागातोर येथील दोन क्लबविरोधात कारवाईचा बडगा! 'ध्वनीमर्यादा' ओलांडल्याबद्दल मालकांवर गुन्हा दाखल

आवाज दाबण्याचा प्रयत्न

उपलब्ध माहितीनुसार, वागातोर किनारी सिआरझेड कक्षेत मोडत असलेल्या जागेचा ताबा महम्मद हसन शेख मिळवला असून जेसीबीच्या साहाय्याने जमीन उखडून टाकली आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रवी हरमलकर व इतरांनी अनेकदा याविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com