फातोर्डा: जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व गोव्याच्या आरोग्य खात्याच्या सहकार्याने हल्लीच माजोर्डा येथे एक कार्यशाळेचे आयोजन करुन गोव्यातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना तीन वेगवेगळ्या साथीच्या रोगांवर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत प्रामुख्याने घटसर्प (Diphtheria), डांग्या खोकला(pertussis), नवजात धनुर्वात (Neonatal tetanus) या साथ पसरणाऱ्या रोगांची लक्षणे ओळखणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचार या रोगावर मार्गदर्शन करण्यात आले.
जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील प्रतिनिधी डॉ. राजीव कुमार, डॉ. हेमंत खारनारे, डॉ. विनायक जळगावकर. डॉ. अमोल गायकवाड यानी या रोगांबद्दल्या रोग परिस्थिती विज्ञाना संबंधीची माहिती दिली.
या पैकी रोग झालेला रु्ग्ण आल्यावर सर्वप्रथम काय करावे? त्याचे निरिक्षण कसे करणे? रुग्णावर पाळत कशी ठेवायची? या संबंधीची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली.
शिवाय, रुग्णाच्या नमुन्याचे संकलन कसे करावे, ते तपासणीसाठी कुठे व कसे पाठवावे, त्याचे व्यवस्थापन व केसचे वर्गीकरण यावरही तज्ञांनी माहिती पुरवली व मार्गदर्शन केले. तसेच एसएसओ, आयडीएसपी डॉ. उत्कर्ष बेतोडकर व सार्वजनिक आरोग्य उपसंचालक डॉ. इरा आल्मेदा यानीही मार्गदर्शन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.