Goa Politics: फोंड्यात नव्या राजकीय समीकरणामुळे गुंतागुंत वाढली; केतन भाटीकरांच्या भूमिकेवर लक्ष

Goa Assembly Elections: विधानसभा निवडणुका जरी अडीच वर्षे दूर असल्या तरी फोंड्यातील राजकारणाला गती यायला लागली आहे.
Goa Politics: फोंड्यात नव्या राजकीय समीकरणामुळे गुंतागुंत वाढली; केतन भाटीकरांच्या भूमिकेवर लक्ष
bjp Dainik Gomantak
Published on
Updated on

विधानसभा निवडणुका जरी अडीच वर्षे दूर असल्या तरी फोंड्यातील राजकारणाला गती यायला लागली आहे. नगरसेवक तथा भाजपचे गटाध्यक्ष विश्वनाथ दळवी यांनी नुकतेच आपल्या वाढदिनाचे औचित्य साधून शक्तिप्रदर्शन केल्यामुळे येथील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यात आगामी विधानसभा निवडणुकी करता भाजप-मगॊप युती झाल्यास आपण फोंडा वा शिरोडा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो, असे मगॊ पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी जाहीर केल्यामुळे इच्छुकांची अवस्था ''आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास'' अशी झाली आहे.

दीपक ढवळीकर फोंड्यातून रिंगणात उतरल्यास डॉ. केतन भाटीकर यांचे काय हा प्रश्न चर्चिला जाऊ लागला आहे. भाटीकरांनी जरी आपण पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असल्याचे सांगून पक्ष जो निर्णय देईल तो आपल्याला मान्य असेल असे सांगितले असले तरी पडद्यामागे बऱ्याच घडामोडी सुरू झाल्या आहेत.

Goa Politics: फोंड्यात नव्या राजकीय समीकरणामुळे गुंतागुंत वाढली; केतन भाटीकरांच्या भूमिकेवर लक्ष
Goa Politics: 'डिकॉस्ता यांनी संपूर्ण एसटी समाजाची माफी मागावी...'; प्रभाकर गावकर आणि अँथनी बार्बोजा आक्रमक

ढवळीकर हे फोंड्यातून रिंगणात उतरल्यास भाटीकरांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवण्याची तयारी त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दुसऱ्या बाजूला विश्वनाथ दळवी यांनी कोणत्याही परिस्थितीत यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केला असून त्यामुळे भाजप -मगॊ युती होऊन फोंड्याची जागा मगोला दिल्यास आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा गर्भित इशारा दळवी यांच्या कार्यकर्त्यांनी दिला असल्याची समजते. दळवी हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे निकटवर्ती म्हणून गणले जात असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले जाण्याची शक्यता कमी असल्याचा होरा राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

Goa Politics: फोंड्यात नव्या राजकीय समीकरणामुळे गुंतागुंत वाढली; केतन भाटीकरांच्या भूमिकेवर लक्ष
Goa Politics: मुख्यमंत्री सावंतांच्या कारभारावर आमदार, मंत्र्यांची नाराजी; विश्वजीत राणेंकडून आमदारांचे वशीकरण सुरु

माजी खासदार नरेंद्र सावईकर हे सध्या'' सायलेंट मोड ''मध्ये असल्यासारखे वाटत असले तरी ते कधीही सक्रिय होऊ शकतात असे त्यांच्या कार्यकर्त्याकडून सांगितले जात आहे. नगराध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतर रितेश रवी नाईक हे जरी थोडे मागे पडल्यासारखे दिसत असले तरी कृषिमंत्री असलेले फोंड्याचे आमदार रवी नाईक हे कधी कोणती चाल खेळतील याचा अंदाज लावणे कठीण आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com