Goa Politics: हिम्मत असेल तर ‘त्या’ माजी मंत्र्यांना तुरुंगात टाका! मुख्यमंत्र्यांच्या काँग्रेसवरील टीकेवर अमित पाटकरांचा हल्लाबोल

Congress state president Amit Patkar: आत्ताच्या भाजप सरकारातील मंत्र्यांना तुरुंगात टाकावे, त्यांच्या फाईल खुल्या कराव्यात, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.
Goa Politics: हिम्मत असेल तर ‘त्या’ माजी मंत्र्यांना तुरुंगात टाका! मुख्यमंत्र्यांच्या काँग्रेसवरील टीकेवर अमित पाटकरांचा हल्लाबोल
Amit Patkar | Goa News Dainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात २००७ ते २०१२ मध्ये असलेल्या काँग्रेस सरकारने राज्य लुटल्याच्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ‘गोमन्तक’ टीव्हीवरील मुलाखतीत केलेल्या आरोपावर आज काँग्रेस नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यात हिम्मत असेल आणि त्यावेळच्या काँग्रेस सरकारने भ्रष्टाचार केला असेल, तर त्यावेळच्या मंत्र्यांना म्हणजेच आत्ताच्या भाजप सरकारातील मंत्र्यांना तुरुंगात टाकावे, त्यांच्या फाईल खुल्या कराव्यात, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.

राज्यातील काही मंत्र्यांविरोधात जनतेत नाराजी आहे, त्यांची अरेरावी नको असे लोक बोलत आहेत, या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना २०१२ पासून भाजपचे सरकार सत्तेत असल्याने पूर्वीचे मंत्री विस्मृतीत गेले आहेत. २००७ ते १२ हा कालावधी आठवल्यास मंत्री कशी लूट करीत होते ते आठवेल, असे म्हटले आहे. त्यावरच काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

पाटकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी त्यावेळच्या काँग्रेस सरकारवर टीका करणे म्हणजे त्यावेळी दिगंबर कामत मुख्यमंत्री होते आणि आज ते भाजपात आहेत. त्यामुळे त्यांची टीका ही लज्जास्पद बाब आहे. कामत यांच्या काळात लुटणारे मंत्री कोण होते, त्यातीलच आलेक्स सिक्वेरा, माविन गुदिन्हो, सुदिन ढवळीकर, विश्‍वजीत राणे ही मंडळी मंत्री होती. त्यांनी लूट केलेली असेल तर त्यांच्या फाईली बाहेर काढाव्यात आणि या सर्वांना तुरुंगात टाकण्याची हिम्मत दाखवावी.

महिला नेत्या मनीषा उसगावकर यांनी गोमन्तक टीव्हीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणतात, २००७ ते १२ पर्यंत काँग्रेसने ईडीसी, खाण घोटाळा, आयडीसी, पीडबल्यू, हेल्थ घोटाळा केला, या घोटाळ्यातील पैसे वसुली करण्यासाठी व त्या मंत्र्यांना अटक करण्यासाठी भाजपला सत्तेवर आणा अशी त्यावेळी भाजपने मागणी केली. लोकांनी भाजपला सत्तेवर आणले, पण तुम्ही त्यांची चौकशी का केली नाही, त्यांच्या फाईली का उघड केल्या नाहीत. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सहा महिन्यांत या लूट करणाऱ्यांना आत टाकू असे सांगितले होते, त्याचे काय झाले. लूट करणाऱ्या मंत्र्यांबरोबरच आताचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत बसून जेवतात. मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवू नये तर कृती करून दाखवावी, अशी मागणीही त्यांनी केली.

गिरीश चोडणकर, माजी प्रदेशाध्यक्ष

अलेक्सो सिक्वेरा, रवी नाईक, सुभाष शिरोडकर, बाबुश मोन्सेरात, नीळकंठ हळणकर, माविन गुदिन्हो आणि विश्वजीत राणे हे सर्व ‘जायका’चा भाग होते आणि ३५ हजार कोटींचा घोटाळा फेम दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील सरकार २००७ ते २०१२ पर्यंत होते. ज्या मंत्र्यांना त्यांनी सर्वाधिक भ्रष्ट राजकारणी म्हणून प्रमाणित करून त्यांना प्रवेश दिला आणि आता डॉ. प्रमोद सावंत मंत्रिमंडळाचे नेतृत्व करत आहेत, अशा मंत्र्यांना स्वच्छ करण्यासाठी भाजपने वॉशिंग मशिनचा वापर केला हे भयावह आहे. मुख्यमंत्री त्यांच्याकडून भ्रष्टाचारावर अतिरिक्त कौशल्य घेतात का? सीएम सावंत यांची अविचारी टिप्पणी करण्याची प्रवृत्ती त्यांच्या असक्षमतेचा पुरावा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com