Utpal Parrikar : बाप-लेकाने पणजीला खड्ड्यांत घातले : उत्पल पर्रीकर

‘स्‍मार्ट सिटी’च्‍या कामांचा घेतला समाचार
Utpal Parrikar
Utpal ParrikarDainik Gomantak
Published on
Updated on

"पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात व महापौर रोहित मोन्सेरात या बाप-लेकाला राजधानी पणजीतील खड्ड्यांबाबत विचारले असता, ते आपले हात वर करतात."

"गेल्‍या विधानसभा निवडणुकीवेळी मी माझ्या भाषणात सांगत होतो की वडील आणि मुलगा मिळून पणजीला खड्ड्यात घालतील. आता पणजी शहराची अवस्था पाहिली तर तेच तंतोतंत खरे घडत आहे," असे उत्पल पर्रीकर यांनी ‘गोमन्तक’च्‍या प्रतिनिधीशी बोलत सांगितले.

Utpal Parrikar
Viral Post: 'बिकिनी घाला', गोव्यातील 'या' शाळेची विद्यार्थिनींना सूचना? व्हायरल पोस्टचे सत्य काय?

मार्चपूर्वी पणजी शहरातील सर्व कामे पूर्ण होणार असे महापौर रोहित मोन्सेरात सांगत होते. परंतु पणजीतील खड्ड्यांविषयी त्यांना विचारल्यास आता हात वर करतात.

जर त्यांना जबाबदारी स्वीकारायचीच नव्हती तर ते पणजीचे लोकप्रतिनिधी म्हणून का मिरवत आहेत? असा सवाल करून उत्‍पल पर्रीकर यांनी ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा समाचार घेतला.

Utpal Parrikar
Rohan Khaunte : अर्थसंकल्प गोमंतकीयांना स्वयंपूर्ण, आत्‍मनिर्भर बनविणारा : रोहन खंवटे

ज्यावेळी लोकप्रतिनिधीलाच मतदारांची चिंता नसते, त्यावेळी मतदारांच्या प्रश्‍नांना डावलण्याची मानसिकता तयार होते. ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत जी कामे सुरू आहेत, ती पणजी महानगरपालिकेच्या अखत्यारित होत आहेत.

महानगरपालिका स्मार्ट सिटी कामांच्या उपद्रवाबाबत न्यायालयात देखील जाऊ शकते. परंतु महापौरांची लोकांना त्रास होत होतोय हे समजून घेण्‍याची मानसिकताच नाहीय.

पावसाळ्यापूर्वी तरी ही कामे पूर्ण झाली पाहिजेत, अन्‍यथा पणजीत सर्वत्र चिखलाची दलदल माजेल, अशा शब्दांत उत्‍पल पर्रीकर यांनी ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा शालजोड्यातून समाचार घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com