BJP Press
BJP PressDainik Gomantak

Rohan Khaunte : अर्थसंकल्प गोमंतकीयांना स्वयंपूर्ण, आत्‍मनिर्भर बनविणारा : रोहन खंवटे

अर्थसंकल्पात सर्वच घटकांचे कल्याण साधण्‍यात आले
Published on

यंदाचा अर्थसंकल्प हा गोमंतकीयांना स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर बनविणारा आहे, असे मत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केले. येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार केदार नाईक व रुपेश कामत उपस्थित होते.

अर्थसंकल्पात सर्वच घटकांचे कल्याण साधण्‍यात आले आहे. नव्याने कर लावण्यात आलेले नाहीत. नवीन योजना सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री आरोग्‍यविमा योजनेअंतर्गत मर्यादा 1.5 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव आहे.

तर, त्‍यासाठीची उत्पन्न मर्यादा 5 लाखांवरून वार्षिक 8 लाख रुपये करण्यात आली आहे. सरकारने दीनदयाळ सुरक्षा योजनेचे पुनरावलोकन करण्याची घोषणाही केली आहे, असे खंवटे म्‍हणाले.

BJP Press
April Fool's Day : ...आणि ‘गोमन्तक’च्या कार्यालयातील फोन खणाणले; वेगळा प्रयोग

"माहिती तंत्रज्ञान विभागाचा विचार करता ‘हर घर फायबर’वर भर देण्यात आला आहे. मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत आयटी स्टार्टअप आणण्याच्या घोषणेमुळे आयटी इकोसिस्टमला चालना मिळेल."

"अर्थसंकल्पात गोवा बियॉण्‍ड बिचेस, कार्व्हान टूर्स, वेलनेस टुरिझम, होम स्टे पॉलिसी, आध्यात्मिक पर्यटन, थीम पार्क, एंटरटेनमेंट पार्क्स, अॅडव्हेंचर टुरिझम विकसित करण्याच्या संधी शोधण्यासाठी पीपीपी मॉडेल तयार करण्याकरिता अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे."

- रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com