Goa Accident: उसगाव-फोंडा मार्गावर चिरेवाहू ट्रक उलटला! चालक जखमी; काही वेळ वाहतूक कोंडी

Usgao Ponda Accident: उसगाव - फोंडा मुख्य महामार्गावर चिरेवाहू ट्रक उलटल्यामुळे या रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली.
Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: उसगाव - फोंडा मुख्य महामार्गावर चिरेवाहू ट्रक उलटल्यामुळे या रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली. दैव बलवत्तर म्हणून या अपघातावेळी रस्त्यावर अन्य वाहने नसल्याने जीवितहानी टळली. आज रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मुख्य रस्त्यावर चिरेवाहू ट्रक उलटला.

उसगावहून फोंड्याच्या दिशेने जाणाऱ्या या चिरेवाहू ट्रक चालकाचे नियंत्रण गेल्याने ट्रक रस्त्याच्या दुभाजकाला धडकून तेथेच उलटला. ट्रक चालक बबलू दवणे किरकोळ जखमी झाला.

Goa Accident
Goa Politics: विरोधकांच्‍या युतीचे भिजत घोंगडे कायम! काँग्रेसची होणार बैठक; मनोज परब, वीरेश बोरकर यांच्‍या दिल्ली दौऱ्यावरून प्रश्‍‍नचिन्‍ह

ट्रक उलटल्यामुळे चिरे रस्ताभर पसरले होते. सुदैवाने या अपघातात इतर वाहने सापडली नाहीत. या रस्त्याचे चौपदरीकरण केल्यानंतर डांबरीकरण योग्य रितीने झाले नसल्याने रस्ता मध्येच उंच सखल झाल्यामुळे हे अपघात होत आहेत असे स्थानिकांनी सांगितले.

Goa Accident
Goa Temples: ‘कोकणाख्याना’त गोव्याचे निर्माण परशुरामाने बाण मारून केल्याचा उल्लेख होतो; धर्मस्थानांच्या दंतकथा

रस्ता डांबरीकरणाचे काम व्यवस्थितरित्या करावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. दरम्यान, रेती आणि चिरे उत्खननाला कायद्याने बंदी असतानाही चिऱ्यांची वाहतूक कशी काय केली जाते असा सवाल स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या गैरप्रकाराला कोण प्रोत्साहन देतो असाही सवाल करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com