कायद्याच्या तरतुदींचा वापर करून उल्लंघनांवर कठोर करणार, विश्वजित राणे

TCP कायद्याच्या 17B च्या तरतुदींचा वापर करून उल्लंघनांवर कठोर उल्लंघनांवर कठोर कारवाई करेल आशी माहिती त्यांनी दिली.
Vishwajeet Rane
Vishwajeet RaneDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: नगरनियोजन मंत्री विश्वजित राणे यांनी बेकायदेशीररित्या टेकडी कापणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. TCP कायद्याच्या 17B च्या तरतुदींचा वापर करून उल्लंघनांवर कठोर कारवाई करेल आशी माहिती त्यांनी दिली.

(Urban Planning Minister Vishwajit Rane has promised to take action against those who cut down the hill illegally)

Vishwajeet Rane
केवळ घोषणा नको, अंमलबजावणी करा; आमदार युरी आलेमाव

राज्यात गाजत असलेल्या नगरनियोजन मंडळाच्या सहाय्याने गठीत केलेल्या समितीचा अहवाल काल मंगळवारी मंत्री विश्‍वजीत राणे यांनी विधानसभेच्या पटलावर मांडला. या अहवालानुसार मायकल लोबो यांनी बार्देश किनारपट्टीत २७ हजार ६४७ चौरस मीटर जमिनीचे रूपांतर केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे असे राणे यांनी हा अहवाल सादर केल्यानंतर सांगितले.

लोबोंकडून तब्बल 27,647 चौमी जमिनीचे रूपांतर

विश्वजीत राणे म्हणाले, या अहवालानुसार मायकल लोबो यांनी कळंगुट-कांदोळी, हडफडे- नागोवा-पर्रा या बाह्य रेखाविकास आराखड्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीर रूपांतरे केली असून डोंगरकापणी खाजन जमिनीत भराव टाकून जमिनीचे सपाटीकरण, उतार कापणी, कूळ जमिनींचे अवैध हस्तांतरण करणे, जमिनीचे अवैध पद्धतीने रूपांतरण करणे, अशा अनेक बाबींचा समावेश आहे.

या सर्व घटना लोबो उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष असताना घडलेल्या आहेत. अहवालानुसार 16 लाख 94 हजार चौ.मी. जमिनीचे रूपांतर केलेले आहे. या सर्वच जमिनीचे रूपांतर रद्द करून परत घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Coarse Farming Affected by Rain
Vijay Sardesai Goa First Alliance
 Shappora River water Goa
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com