गोव्यात आयोजित 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची गुरुवारी (दि.09) सांगता झाली. राज्यात पहिल्यांदाच झालेल्या देशातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत राज्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत इतिहासात पहिल्यांदाच विक्रमी पदकांची कमाई केली.
गोव्याने शेवटच्या दिवसअखेर 27 सुवर्ण पदकांसह एकूण 92 पदकांची कमाई करत पदक तालिकेत टॉप टेनमध्ये स्थान मिळवले आहे.
सुशोभिकरण करुन नवीन साज चढवण्यात आलेल्या तार-म्हापसा येथील जंक्शनचा परिसर यापुढे ‘सर्कल ऑफ जॉय’ या नावाने ओळखला जाणार आहे.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजे,11 नोव्हेंबर रोजी माजी आमदार ग्लेन टिकलो, बस्तोडा पंचायतीचे सरपंच सुभाष मोरजकर तसेच इतर पंचसदस्यांच्या उपस्थितीत नूतनीकरण केलेल्या या सर्कलचे उद्घाटन होणार आहे. माजी सरपंच सावियो मार्टीन्स यांनी याविषयी माहिती दिली.
देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते गोव्याचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांच्या वामन वृक्ष कला या पुस्तकाचे प्रकाशन नव्या दरबार हॉल येथे पार पडले.
पुस्तक प्रकाशन सोहळ्याला व्यासपीठाकडे जाताना धनकड यांनी गोव्यातील 94 वर्षीय शेतकऱ्याच्या चरणांना स्पर्श केला. त्यानंतर काही काळ चर्चा करून धनकड व्यासपीठाकडे गेले.
पारंपरिक धोतर परिधान करुन आलेल्या केळकर यांच्याशी संवाद साधला. काही काळ चर्चा केल्यानंतर धनकड केळकर यांच्या चरणांना स्पर्श करुन व्यासपीठाच्या दिशेने पुढे गेले.
खाण कंपन्यांकडील थकीत असलेल्या 271 कोटी रुपयांची वसुली करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. 2012 पासून या थकीत रकमेवर 4 कोटी रुपये मासिक व्याज मिळणार, असे गृहीत धरले तर आतापर्यंत 11 वर्षांचे कोट्यवधी रुपये होतात.
परंतु भाजप सरकार या वसुलीविषयी गंभीर दिसत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या थकीत 271 कोटींच्या रकमेविषयी जनतेला उत्तर द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली.
यापुढे सर्व सरकारी खात्यात खेळाडूंसाठी 4 टक्के आरक्षण देणार. राष्ट्रीय स्पर्धांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील पायाभूत सुविधा व मानव संसाधन आम्ही तयार केले असून याचा फायदा यापुढे राज्यातील खेळाडूंना होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 37 व्या क्रीडा स्पर्धेच्या समारोप प्रसंगी दिली.
इथून पुढे राज्यातील 39 मैदाने ठराविक खेळांसाठी नामांकित केली जाणार. पर्यटन राज्य म्हणून ओळख असणारे राज्य आता क्रीडा स्पर्धांसाठी ओळखले जाईल, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती.
खड्डे-बाळ्ळी येथून दुर्दैवी घटना समोर येतेय. बाळ्ळी येथील रहिवासी चंद्रावती वेळीप यांचा त्यांच्या घराच्या वरून गेलेल्या विद्युत वीज वहिनीला स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
चंद्रावती शाबा वेळीप (वय 60) असे या दुर्दैवी मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेची पोलिसांत नोंद झाली असून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी चंद्रावती या घराच्या छतावर मासळी सुकवण्यासाठी जात होत्या. त्यावेळी त्यांचा स्पर्श त्या उच्च दाबाच्या वीजवाहिनीशी झाला.
गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या खासगी प्रवासी बसचा कोकरूड, शाहूवाडी येथे अपघात झाला. बस थेट पुलावरून वारणा नदी पात्रात कोसळसली. गुरुवारी (दि.09) सकाळी 6 वाजता हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, गोवा- मुंबई खासगी प्रवासी बस कोकरूड (शाहूवाडी) येथील पुलावरून वारणा नदी पात्रात कोसळली. सुदैवाने या अपघात कोणीही दगावले नाही. काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (इफ्फी) आता अवघे काही दिवस उरले आहेत. येत्या 20 नोव्हेंबरपासून हा महोत्सव सुरू होत आहे. त्याची जोरदार तयारी पणजीत सुरू आहे.
दरम्यान, इफ्फी च्या उद्घाटनला बॉलीवूड अभिनेता सलमान खान येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर आता इफ्फी तील महत्वाचा उपक्रम असलेल्या मास्टरक्लास मध्ये कोणकोण कलाकार येणार आहेत, त्याचीही नावे समोर येत आहेत.
गोव्यात होणाऱ्या 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (इफ्फी) आता अवघे 11 दिवस उरले आहेत. त्या पार्श्वभुमीवर गोव्यात तयारीला वेग आला आहे. राज्य तसेच केंद्र पातळीवरही वरचेवर इफ्फीच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे.
आज, गुरूवारी केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरूगन हे आज, गुरूवारी गोव्यात दाखल झाले. त्यांनी इफ्फी च्या तयारीचा आढावा घेतला.
37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या समारोप सोहळ्यासाठी उपराष्ट्रपती गोव्यात दाखल झाले आहेत. त्याआधी ते राजभवनवर राज्यपालांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. यावेळी भाषणात उपराष्ट्रपतींनी गोव्यातील नेत्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा उल्लेख केला. यावेळी प्रकाशन सोहळ्यासाठी मान्यवरांची उपस्थिती पाहून ते म्हणाले की, हे सर्व श्रेय राज्यपालांचेच.. ते खऱ्या अर्थाने जादूगारच आहेत. त्यांच्यामुळेच इतके दिग्गज आज या कार्यक्रमासाठी हजर राहिले. मी गोव्याच्या राज्यपालांचे मनापासून अभिनंदन करतो
शहा आयोगाच्या अहवालानुसार सरकाराच्याच आकडेवारीप्रमाणे वेदांता लिमीटेड कंपनीची 165 कोटींची थकबाकी. मामलेदारांकडून रिकव्हरीसाठीची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात. असे असतानाही खाणींच्या ई-लिलावात वेदांता कंपनीला मिळालेत दोन मायनिग ब्लॉक. मुख्यमंत्र्यांनी दिवाळीपुर्वी याची वसूली करावी, अशी अमित पाटकर यांची मागणी.
बुधवारी झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे साळावली धरण भरून ओव्हरफ्लो झाले. काल दिवसभरात एकूण 58.6 मि.मी. पावसाची नोंद झाली .
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांवरून कॉंग्रेसने सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. स्पर्धांच्या नियोजनावरून ते खेळाडूंपर्यंत सरकारचे काम निकृष्ट असल्याचे मत विरोधी पक्षनेते व्यक्त करत आहेत. त्यातच महामार्गावर सायकलिंग स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल कुठ्ठाळी कॉंग्रेसचे ओलेन्सियो सिमॉइस यांनी क्रीडा विभागावर टीका केली आहे.
सरकारचे नियम आणि कोर्टाचे आदेश मोडून अमित पाटकरांकडून ई लिलावाच्या खाण मालाची वाहतूक, असा आरोप मनोज परब यांनी केला होता. याप्रकरणी अमित पाटकरांनी मनोज परब यांच्या विरोधात पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
गोव्यातील साळगाव येथे 12 नोव्हेंबर 2023 ते 18 नोव्हेंबर 2023 या कालावधीत 'लेडीज वीक'चे आयोजित करण्यात आले आहे. दरवर्षा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
या लेडीज वीकमध्ये महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व वयोगटातील महिलांसाठी हा कार्यक्रम खुला असणार आहे.
सात दिवस महिलांसाठी यात रोमांचक कार्यक्रम असणार आहेत. विविध स्पर्धा यामध्ये घेण्यात येणार आहेत. सायंकाळी सहा नंतर हे कार्यक्रम होणार आहेत. प्रत्येक स्पर्धेतून दोन विजेते घोषित केले जाणार आहेत.
बाणस्तारी येथील पुलावर झालेल्या मर्सडीज कारच्या भीषण अपघाताला 4 महिने उलटले आहेत. तरीही या प्रकरणात अद्याप पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यात यश आलेले नाही.
या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता आणि इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. फॉरेन्सिक अहवाल प्रलंबित असल्यामुळे आरोपपत्र दाखल करण्यात विलंब झाल्याचे सांगितले जात आहे.
खोर्ली, म्हापसा येथे घराला लाग लागल्याने ७५ वर्षीय वृद्धा निशा कोरगावकर या जखमी झाल्या. कोरगावकर यांनी आपली ही खोली अंगणवाडीला भाडयाने दिली आहे. त्या घरी एकट्याच राहतात. सध्या त्यांच्यावर जिल्हा इस्पितळात उपचार सुरू असून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. पहाटे ४वाजण्याची घटना. या घटनेत ३० हजारांचे नुकसान झाले, तर म्हापसा अग्निशमन दलाने १ लाख रुपयांची मालमत्ता वाचवली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.