रहस्यमय! 112 वर्षानंतर दोना पावला येथील ब्रिटीश स्मशानभूमीत दफन झाला मृतदेह; तक्रार दाखल, तपास सुरू

हा मृतदेह कोणाचा तसेच, कोणी दफन केला असे प्रश्न यामुळे उपस्थित झाले आहेत.
British Cemetery Dona Paula Goa
British Cemetery Dona Paula GoaDainik Gomantak
Published on
Updated on

British Cemetery Dona Paula Goa: दोना पावला येथील संरक्षित असलेल्या ब्रिटीश स्मशानभूमीत अनोळखी लोकांनी मृतदेह दफन केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

हा मृतदेह कोणाचा तसेच, कोणी दफन केला असे प्रश्न यामुळे उपस्थित झाले आहेत. तक्रार दाखल झाल्यानंतर पणजी पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोना पावला येथील संरक्षित ब्रिटीश स्मशानभूमीत काही लोकांनी अवैधरित्या मृतदेह दफन केल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी पणजी पालिकेचे नगरसेवक नेल्सन काब्राल यांनी तक्रार दाखल केल्याची माहिती मिळाली असून, पणजी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

स्मशानभूमीत 42 कबर आहेत. 1912 साली येथे शेवटचे शव दफन केल्याची माहिती आहे. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर याला राज्य संरक्षित साईट म्हणून घोषित करण्यात आले.

British Cemetery Dona Paula Goa
Akasa Air: 'अकासा एअर'चा आवाका वाढणार; गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळमध्ये होणार विस्तार

गोव्यात 1802 मध्ये ब्रिटिशांनी लष्करी किंवा ब्रिटिश स्मशानभूमी बांधली होती. ब्रिटिश स्मशानभूमी 180 वर्षांहून अधिक जुनी मानली जाते, नेपोलियनच्या काळात गोव्याच्या भूभागावर ब्रिटीशांनी कब्जा केल्याची ही एकमेव आठवण आहे.

1799 ते 1813 पर्यंतच्या नेपोलियनच्या युद्धांदरम्यान, ब्रिटिश लष्करी स्मशानभूमी बांधण्यात आली असे सांगितले जाते. 1808 येथे पहिला मृतदेह दफन करण्यात आला त्यानंतर 1902 मध्ये येथे शेवटचा मृतदेह दफन केल्याची माहिती आहे.

दरम्यान, नुकतेच उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे खळबळ निर्माण झाली असून, यामागील खरे सत्य पोलिस तपासानंतरच समोर येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com