Akasa Air: 'अकासा एअर'चा आवाका वाढणार; गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळमध्ये होणार विस्तार

अकासा गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ राज्यात त्यांच्या विमानफेऱ्या वाढवण्याबाबत प्रयत्नशील आहे.
Akasa Airlines
Akasa AirlinesDainik Gomantak
Published on
Updated on

Akasa Air: विमान वाहतूक सेवेत नव्याने प्रवेश कलेल्या अकासा विमानसेवा आता विविध राज्यात त्यांचा विस्तार वाढवण्याचा विचार करत आहेत. अकासा गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ राज्यात त्यांच्या विमानफेऱ्या वाढवण्याबाबत प्रयत्नशील आहे. या चारही राज्यात प्राईम स्लॉट मिळण्याची अकासाने इच्छा व्यक्त केली आहे.

येत्या सहा महिन्यात वाढती प्रादेशिक मागणी लक्षात घेता चारही राज्यात विमानफेऱ्या वाढवण्याची संधी आहे. असे अकासाने म्हटल आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे विमानतळ, गोव्यातील दोन्ही विमानतळ (दाबोळी आणि मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ), केरळमधील कोचीन आणि तिरुवनंतपुरम विमानतळ तसेच कर्नाटकमधील मंगळुरू आणि बंगळुरूचे केम्पेगौडा विमानतळ याठिकाणापासून विमानफेऱ्या सुरू करण्याबाबत अकासा प्रयत्नशील आहे.

या विमानतळावर स्लॉट मिळाल्यानंतर भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील विमानफेऱ्या वाढवण्याबाबत विचार केला जाणार आहे. असे कंपनीने म्हटले आहे.

Akasa Airlines
Goa Monsoon Session: गोवा विधानसभा पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर, 'हे' मुद्दे गाजण्याची शक्यता

गो फर्स्टच्या दिवाळखोरीमुळे स्लॉट मिळण्याची शक्यता

आघाडीची विमानसेवा कंपनी गो फर्स्टच्या दिवाळखोरीमुळे अकासाला स्लॉट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गो फर्स्ट मागील काही दिवासांपासून आर्थिक समस्यांचा समाना करत आहे. यामुळे कंपनीने अनेक विमान उड्डाणे रद्द केली. गो फर्स्टच्या दिवाळखोरीमुळे रद्द झालेल्या ठिकाणी अकासाला संधी मिळण्याची शक्यात जाणकार व्यक्त करताहेत.

ऑगस्ट 2022 मध्ये अकासा एअरचे ऑपरेशन सुरू झाल्यापासून, सध्या ते देशातील 17 शहरांना जोडत आहे. अकासा दिवसाला देशात 110 फ्लाईटस् ऑपरेट होतात. अकासाच्या ताफ्यात मार्च 2024 पर्यंत विमानांची संख्या 28 होईल असे कंपनीने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com