Margao Crime Case: मडगावात सरकारी कर्मचाऱ्यावर कार्यालयात घुसून प्राणघातक हल्ला, हल्लेखोर फरार

Margao Crime Case: दक्षिण गोव्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात अज्ञात व्यक्तीकडून कर्मचाऱ्यावर हेल्मेटने प्राणघातक हल्ला
Land and survey department
Land and survey department Dainik Gomantak
Published on
Updated on

Margao Crime Case: दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील भू सर्वेक्षण विभागातील कर्मचाऱ्याला कार्यालयात आलेल्या अनोळखी व्यक्तीने त्याच्याकडील हेल्मेटने मारहाण करत कार्यालयातून पळ काढल्याची घटना सोमवारी 18 मार्चला दुपारच्या सुमारास घडली.

दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली असून या कॉम्प्लेक्सखाली सुरक्षारक्षक असूनही अशी घटना घडल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण झाला आहे.

या घटनेसंबंधी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मडगावातील साल्ढाणा कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावर भू सर्वेक्षणचे कार्यालय आहे.

या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कार्यालयात आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने हेल्मेटने मारहाण केली.

सदर कर्मचारी बेशुद्ध पडेपर्यंत त्या व्यक्तीने मारहाण केल्याचे वृत्त समजले आहे. हा कर्मचारी सर्वेअर पद सांभाळत आहे. दरम्यान त्या अज्ञात व्यक्तीने तेच हेल्मेट घालून कार्यालयातून पळ काढला.

दरम्यान जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच त्या अज्ञात व्यक्तीविरोधात फातोर्डा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीय.

हा प्रकार नेमका कसा घडला? पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली आहे का? वगैरे कोणतीही माहिती समोर आली नाहीय.

Land and survey department
Revolutionary Goans Party: धारगळमधील RMC प्रकल्पाविरुद्ध RG आक्रमक; ग्रामस्थांसहित पंचायतीवर धडक मोर्चा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com