Revolutionary Goans Party: पेडणे तालुक्यातील धारगळ गावच्या रहिवाशांनी परिसरात होणाऱ्या रेडी-मिक्स काँक्रिट (RMC) प्लांटच्या प्रकल्पाविरोधात आवाज उठवला होता.
बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या या प्रकल्पबाबत RG चे मनोज परब यांनी धारगळवासियांची भेट घेऊन सहकार्याचे आश्वासन दिले होते.
होणारे प्रदुषण, इथल्या निसर्गाची हानी, तसेच स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न ह्या सर्व गंभीर बाबी लक्षात घेवून फेब्रुवारी महिन्यात RG चे प्रमुख मनोज परब यांनी गावाला भेट देत स्थानिकांशी चर्चा केली होती.
तसेच ह्या बेकायदेशीर प्रकल्प हटवला जात नाही तोवर आम्ही ह्या प्रकरणाचा पाठपुरावा करू आणि याप्रश्नी आम्ही ग्रामस्थांना सर्वोपरी मदत करणार असल्याचे वचन दिले होते.
त्याच विषयाच्या अनुषंगाने काल सोमवारी (17 मार्च) RG चे मनोज परब, अजय खोलकर यांनी धारगळवासियांना घेवून ग्रामपंचायतीवर धडक दिली होती.
यावेळी मनोज परब यांनी पंचायत सचिवांना परत एकदा, हा बेकायदेशीर आणि हानिकारक असा RMC प्रकल्पामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ बनला असून परप्रांतीयांच्या दादागिरीमुळे या प्रकल्पचे संपूर्ण गावावर संकट उभे राहिले असल्याची भीती बोलून दाखवली.
''खरं म्हणजे पंचायतीने हे गाव नष्ट करणाऱ्या प्रकल्पांना ताळे ठोकले पाहिजे होते. परंतु आज तसे होत नसून, दुःखाची गोष्ट आहे. आम्ही शेवटपर्यंत धारगळवासियांबरोबर असून त्यांना न्याय मिळेपर्यंत लढू'', असा इशारा यावेळी परब यांनी दिला.
पंचायतीने आता त्या बेकायदेशीर प्रकल्पाच्या दलालाच्या बाजूने राहायचे की गावकऱ्याबरोबर राहून गावाचे रक्षण करायचे ठरवावे असा इशारा मनोज परब यांनी यावेळी दिला. .
पंचायतीला दिलेल्या ह्या धडक मोर्चा दरम्यान आर.जी. चे प्रवक्ते तसेच सल्लागार अजय खोलकर यांनी पंचायत सचिवांना, पंचायत राज ॲक्टच्या कायद्याविषयी जाणीव करून देत , निवासी क्षेत्राजवळील असलेला हा प्रदूषित, गाव विनाशक आरएमसी प्लांटला कोणकोणत्या कायद्याअंतर्गत रोखले जाऊ शकते याबद्दलचा जणू पाढाच वाचला होता.
पंचायत, टीसीपी, आरोग्य विभागाकडून अंतिम एनओसी न घेता सिमेंट प्लांटने काम सुरू केल्याचे सिद्ध झालेलेच आहे. प्रकल्पामुळे रहिवासी परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जर पंचायत सचिवांनी योग्य प्रकारे पंचायत मंडळाला ह्याबाबत मार्गदर्शन केले नाही, आणि हा बेकायदेशीर प्रकल्प चालूच राहिला तर, विजिलन्स मध्ये तकर करणार असल्याचा इशाराही यावेळी खोडकर यांनी पंचायत सचिवांना दिला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.