Goa University: 'त्या' अळ्या हॉस्टेलच्या नव्हे, तर बाहेरून आणलेल्या जेवणात होत्या! प्रा. सुंदर धुरी यांच स्पष्टीकरण

University Hostel Food: विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये निकृष्ट अन्न पुरविणाऱ्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांना शनिवारी दुपारच्या जेवणासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती.
 University Hostel Food
Goa UniversityDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये निकृष्ट अन्न पुरविणाऱ्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांना शनिवारी दुपारच्या जेवणासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी आठ विद्यार्थ्यांसाठी बाहेरून मागविण्यात आलेल्या अन्नामध्ये काही अळ्या आढळल्या. मात्र, त्या हॉस्टेलमधील जेवणात नव्हत्या, असे विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. सुंदर धुरी यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.

ते म्हणाले, कंत्राट रद्द केल्यानंतर हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी पर्यायी जेवणाची व्यवस्था सुरू करण्यात आली असून, लवकरच नव्या व्यक्तीला कंत्राट देण्यात आहे. विद्यार्थ्यांना सध्या बाहेरून अन्न पुरविण्यात येत असून ते स्थानिक व्यक्तीकडून आणले जाते.

 University Hostel Food
Goa Education: शाळेची घंटा वाजणार 6 जूनपासून, महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष 19 पासून होणार प्रारंभ, शालेय साहित्य दरात 15 टक्क्यांनी वाढ

त्याची दररोज तपासणी केली जाते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य असे पदार्थ त्यांना पुरविले जात आहेत. विद्यार्थ्यांना चांगले अन्न मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नरत असून नव्या कंत्राटासाठी निविदा काढण्यात आली आहे. ही प्रक्रिया सुरू झाली असून, चांगल्या केटररच्या शोधात आम्ही आहोत. विद्यार्थी वर्षभराच्या जेवणासाठी शुल्क भरत असल्याने त्यांना दर्जेदार आहार पुरविणे ही आमची जबाबदारी आहे.

स्वयंसहाय्य गटांनी पुढाकार घ्यावा

गोवा विद्यापीठ परिसरातील कँटीन आणि हॉस्टेल मेस चालविण्यासाठी राज्यातील स्वयंसहाय्य गट तसेच स्थानिकांनी पुढाकार घेऊन निविदा स्वीकाराव्यात. गुणवत्तापूर्ण अन्न पुरविण्यासाठी केंद्रीकृत कंत्राट पद्धत बंद करून प्रत्येक कँटीन आणि हॉस्टेल मेससाठी स्वतंत्र निविदा काढण्यात येणार असल्याचे प्रा. धुरी यांनी सांगितले.

 University Hostel Food
गोवा विद्यापीठ पदव्युत्तर, बी.एड. प्रवेश प्रक्रिया सुरू; 18 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

भाविपकडून ‘समस्या शोध’ अभियान

राज्यातील उच्च माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये आणि विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), गोवा तर्फे राज्यस्तरीय ‘समस्या शोध’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत १३ ते १८ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या अभाविपच्या कार्यकर्त्यांकडून जाणून घेऊन त्या संबंधित विद्यालयीन किंवा महाविद्यालयीन प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहेत. या अभियानात राज्यातील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन शिक्षण क्षेत्रातील उणीवा समोर आणाव्यात आणि त्या सुधारण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com