सडये-शिवोलीत जपली जाते लग्नबंधनाची अनोखी प्रथा

लग्न ठरलेल्या युवतीकडून सायबिणीला चढविला जातो पांढरा मुकुट; आजही अखंडित चालते परंपरा
Tradition for marriage in Sadye Siolim
Tradition for marriage in Sadye SiolimDainik Gomantak
Published on
Updated on

शिवोली : मे महिन्याचा प्रथम दिवस हा देशात कामगारदिन म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. बार्देशातील सडये - शिवोलीत मात्र हाच दिवस एका आगळ्यावेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो. १ मे नंतर शिवोली गावात प्रथमच लग्न ठरलेल्या वधूने अवर लेडी ऑफ फातिमा सायबिणीच्या पुतळ्याला पांढऱ्या शुभ्र फुलांचा मुकुट चढविण्याची प्रथा जपली जाते.

Tradition for marriage in Sadye Siolim
शिरगावच्या लईराई देवीचा गुरुवारी जत्रोत्सव

वयात आलेल्या प्रत्येक मुलीला वेध लागतात ते योग्य जोडीदार शोधून त्याच्याशी लग्नाची गाठ बांधण्याचे. अर्थातच त्यात काहीच गैर नसून निसर्गाच्या प्रक्रियेनुसारच हे चाललेले असते. सडये - शिवोलीतील गावसावाडो परिसरातील ज्या मुलीचे लग्न 1 मेनंतर सर्वप्रथम ठरलेले असते त्या मुलींकडून हुबेहूब नवरीच्या वेशात सबंध गावाच्या साक्षीने गावच्या माय-दे-देऊश पुरातन चॅपेलसमोर असलेल्या अवर लेडी ऑफ फातिमा सायबिणीच्या पुतळ्याला पांढऱ्या शुभ्र फुलांचा मुकुट चढवला जातो. यावेळी नवरीचे संपूर्ण कुटुंब तसेच धर्मगुरु आणि गावातील थोरामोठ्यांसह तरुण मंडळीही उपस्थित असतात.

Tradition for marriage in Sadye Siolim
चोडण बेटावर दिवसाआड पाणीपुरवठा; लोकांचे हाल

सायबिणीच्या पुतळ्याला पांढऱ्या फुलांचा मुकुट चढविल्यानंतर चर्चमध्ये लग्न सोहळ्यासमान प्रार्थनेचे आयोजन केले जाते. यावेळी मार्ना शिवोलीतील सेंट अँथनी चर्चचे धर्मगुरू तसेच स्थानिक धर्मोपदेशक उपस्थित असतात.

गावातील जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 1943 पासून गोवा स्वातंत्र्याच्या आधीपासूनच समुदायाच्या लोकांना एकत्रित आणण्यासाठी त्यावेळचे धर्मगुरू फा. लाझारस आंद्राद यांनी या प्रथेची सुरवात केल्याचे बोलले जाते. लग्नासाठी सज्ज असलेल्या तसेच लग्न निश्चित झालेल्या नवरीकडून येथील सायबिणीच्या पुतळ्याला मुकुट परिधान केल्याने भावी आयुष्यासाठी निवडलेला जोडीदार शेवटपर्यंत साथ देतो आणि लग्नानंतरचे उर्वरित आयुष्य सुखा समाधानाने व्यतीत होते असा आजही या भागातील ख्रिस्ती लोकांचा समज आणि श्रद्धा आहे. या प्रथेसाठी निवडण्यात येत असलेली नवरी स्वतःला भाग्यवान समजते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com