केपे : गावचे युवक होळीच्या रात्री मल्लिकार्जुनाच्या देवळासमोर एकत्र येतात. वाजत गाजत आणलेली होळीची माडी (फोफळीचे कांड) देवळासमोरील मांडावर उभे करतात आणि सुरू होते अनोखी शेणी उझ्याची होळी... (unique Holi is celebrated in Molcarnem village)
केपे पासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मळकर्णे गावात ही अनोखी होळी खेळली जाते. या होळीच्या माडीवर तरुण वर चढू लागतात आणि खाली असलेले भाविक त्यांच्यावर पेटलेली शेणी फेकून मारतात. ही अनोखी परंपरा (Tradition) पाहण्यासाठी शेकडोंच्या संख्येने लोक देवळाच्या प्रांगणात जमा होतात.
शेणी म्हणजे शेणाची सुकी गोवरी. ही पेटलेली शेणी अंगावर फेकली की गावातील इडा पीडा दूर होते आणि रोगराई टळते असा समज असून या उत्सवात भाग घेणारे सात दिवस व्रतस्थ राहतात. असे जे व्रतस्थ राहतात त्यांनाच या उत्सवात भाग घेता येतो अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. यावेळी मांडावर काही भाविक आंब्याचे ताळे घेऊन पारंपरिक वाद्याच्या तालावर नाचतात. माडीवर चढलेल्या गाड्यावर जेव्हा पेटती शेणी फेकली जाते, तेव्हा ती त्याच्यावर आपटून आगीच्या ठिणग्या सर्वत्र पसरतात. खाली आंब्याचे ताळे घेऊन नाचणाऱ्यावरही या ठिणग्या पडतात. देवाचाच (God) हा प्रसाद समजून आपल्यावर झालेली ती कृपा समजतात.
शेकडो वर्षापासून मळकर्णे गावात ही आगळी वेगळी होळी साजरी केली जात असून गावा बाहेर राहणारे मळकर्णेवासीय या उत्सवात (festival) भाग घेण्यासाठी आवर्जून गावात येत असतात. पेटलेल्या होळीसमोर (Holi) नारळ फोडून सर्व गावाचे कल्याण होवो आणि रक्षण होवो असे गाऱ्हाणे घातले जाते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.