धनगर समाजातील मुलींनी सांस्कृतिक परंपरेचा वारसा पुढे चालवावा

धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष बि. डी. मोटे यांचे आवाहन
धनगर समाजातील मुलींनी सांस्कृतिक परंपरेचा वारसा पुढे चालवावा
धनगर समाजातील मुलींनी सांस्कृतिक परंपरेचा वारसा पुढे चालवावा Dainik Gomantak
Published on
Updated on

पिसुर्ले : धनगर समाजाला फार मोठी सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे, परंतु त्या परंपरेची बदलत्या काळात सुद्धा जोपासना होणे गरजेचे आहे, त्यासाठी सरकारच्या कला आणि सांस्कृतिक खात्याच्या वतीने बऱ्याच योजना असून त्याचा लाभ घेण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे, त्याचाच एक भाग म्हणून गोवा धनगर समाज सेवा संघाच्या माध्यमातून कार्य करीत असताना भुईपाल धनगरवाडा येथील पंधरा वर्षांखालील 10 मुलींना कला आणि संस्कृतीक खात्याच्या सौजन्याने गुरू शिष्य परंपरा उत्तराधिकारी या योजनेचा लाभ मिळवून देण्यास यशस्वी ठरलो आहोत, त्यामुळे समाजातील ज्येष्ठाकडे असलेल्या सांस्कृतिक कलेचे धडे तरूण पिढीला प्राप्त होऊन सदर वारसा तसाच पुढे चालू राहणार आहे, असे उद्गगार गोवा धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष बि. डी. मोटे यांनी सदर योजने अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या मुलीशी संवाद साधताना काढले. (The girls of Dhangar community should carry on the cultural heritage says B D Mote)

धनगर समाजातील मुलींनी सांस्कृतिक परंपरेचा वारसा पुढे चालवावा
काणकोणात रंगतो आगळा-वेगळा शिगमोत्सव!

या प्रसंगी व्यासपीठावर प्रशिक्षण देण्यास नेमलेल्या गुरू नागी नाऊ वरक, साहयक गुरू गौरवी गंगाराम पावणे, सरकारी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका नीता पवन वरक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोटे म्हणाले की समाजातील ज्येष्ठ नागरिकांकडे बऱ्याच प्रमाणात सांस्कृतिक लोक कलेची परंपरा आहे, ती पंरपरा हा मोठा ठेवा आहे, त्याची जोपासना करून भावी पिढीला तीचे धडे दिले पाहिजेत, त्यासाठी गोवा धनगर समाज सेवा संघाने पुढाकार घेतला असून समाजातील सुशिक्षित पिढी सर्व क्षेत्रात सक्षम असावी, यासाठी येणाऱ्या काळात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत, यामध्ये समाजातील सांस्कृतिक लोक कलेचे धडे देताना इतर समाजातील लोक कला तसेच भजन, आरती अशा प्रकारचे प्रशिक्षण युवक युवतींना प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, येथे राबविण्यात आलेल्या गुरू शिष्य परंपरा उत्तराधिकारी योजने अंतर्गत मिळालेल्या प्रशिक्षणाचा लाभ मुलींनी इतर मुलांना देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी प्रशिक्षण घेतलेल्या निकीता भैरू वरक, भारती मुलू वरक या मुलींनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की प्रशिक्षण काळात भरपूर माहिती मिळाली आहे, त्याच प्रमाणे सदर योजना अंमलात आणण्यासाठी गोवा धनगर समाज सेवा संघाने पुढाकार घेऊन लोक कलेचे धडे दिल्याने संस्थेचे तसेच कला आणि सांस्कृतिक खात्याचे आभार व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com