Nitin Gadkari In Goa: 'गोव्याला प्रदूषण अन् अपघातमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्या'; गडकरींची मुख्यमंत्र्यांना सूचना!

Goa Accident And Pollution Free Initiative: गडकरींनी गोव्यात आतापर्यंत केंद्र आणि राज्यसरकारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामाचा धांडोळा घेतला. तसेच, गोव्यातील वाढते अपघात आणि प्रदूषण या समस्यांवरही प्रकाश टाकला.
Nitin Gadkari In Goa: 'गोव्याला प्रदूषण अन् अपघातमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्या'; गडकरींची मुख्यमंत्र्यांना सूचना!
Nitin Gadkari Dainik Gomantak
Published on
Updated on

गोव्याला स्मार्ट बनवण्यासाठी राज्यसरकार केंद्र सरकारच्या सहकार्याने युद्धपातळीवर काम करत आहे. मंगळवारी (21 जानेवारी) मुरगाव रवींद्र भवन ते एमपीटीला जोडणाऱ्या पुलाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्धाटनानंतर आपल्या भाषणादरम्यान गडकरींनी गोव्यात आतापर्यंत केंद्र आणि राज्यसरकारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामाचा धांडोळा घेतला. तसेच, गोव्यातील वाढते अपघात आणि प्रदूषण या समस्यांवरही त्यांनी प्रकाश टाकला.

अपघात आणि प्रदूषणमुक्त गोवा करण्याची सूचना

वाढते अपघात आणि प्रदूषणाची समस्या गोव्याला नवी नाहीये. गडकरींनी आपल्या भाषणादरम्यान गोव्यातील अपघात आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना केली. तसेच, गोव्याला अपघात आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा हेही सांगायलाही गडकरी आपल्या भाषणादरम्यान विसरले नाहीत.

Nitin Gadkari In Goa: 'गोव्याला प्रदूषण अन् अपघातमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्या'; गडकरींची मुख्यमंत्र्यांना सूचना!
Nitin Gadkari In Goa: ''साखर बघितली तर चमचे आपोआप येतात...''; गोव्यात बोलताना नितीन गडकरी असं का म्हणाले?

3,500 कोटींच्या प्रकल्पाची पायाभरणी

दरम्यान, आज (21 जानेवारी) मुरगाव रवींद्र भवन ते एमपीटीला जोडणाऱ्या उड्डाण पुलाच्या कामासह 3,500 कोटी रुपयांच्या इतर पाच प्रकल्पांची देखील पायाभरणी करण्यात आली. 58 किलोमीटर लांबीच्या दक्षिण गोव्यातील या महामार्गामुळे जिल्ह्यातील कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com