CBI Registered Cases Against Various Civil Service Officers : मागील पाच वर्षांमध्ये म्हणजेच 2018 ते 2023 या वर्षांत सीबीआयने विविध नागरी सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांविरोत 135 प्रकरणे दाखल केले असल्याची माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
या 135 प्रकरणांपैकी 57 प्रकरणांमध्ये संबंधित न्यायालयांमध्ये आरोपपत्र दाखल केले असून खटल्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान दाखल खटल्यांमध्ये गोव्यातील 2 खटल्यांचा समावेश आहे.
मागच्या पाच वर्षांत (2018 ते 2022) दाखल केलेल्या या 135 प्रकरणांच्या बाबतीत केंद्रीय दक्षता आयोगाने पहिल्या टप्प्यात 12,756 तर दुसऱ्या टप्प्यात 887 अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस केली असल्याची माहितीही सिंह यांनी सभागृहाला दिली.
यांपैकी 719 अधिकाऱ्यांविरोधात खटला चालवायला मान्यता दिली जावी अशी शिफारसही केंद्रीय दक्षता आयोगाने केल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश या तिन्ही राज्यांमध्ये दाखल खटल्यांची संख्या भारतातील ईतर राज्यांच्या तूलनेत जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये 24, दिल्लीमध्ये 15 तर उत्तर प्रदेश 11 खटले दाखल करण्यात आले आहेत.
तर सर्वात कमी आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मेघालय, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये प्रत्येकी एक खटला दाखल आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.