Bondla Wildlife Sanctuary : बोंडला’ला उतरती कळा; वनमंत्र्यांची माहिती

सुधारणांसाठी प्रयत्न सुरू
vishwajit rane On Bondla Wildlife Sanctuary
vishwajit rane On Bondla Wildlife Sanctuary Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Assembly Monsoon Session 2023 : बोंडला येथे राज्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय आहे. मात्र, तेथील परिस्थिती देशातील इतर राज्यांतील प्राणिसंग्रहालयांच्या तुलनेत बरी नाही. गेले वर्षभर त्या ठिकाणी बृहदआराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यात यश आलेले नाही. खुद्द वनमंत्री विश्वजीत राणे यांनी विधानसभेत ही माहिती दिली.

प्राणिसंग्रहालय सुधार योजनेवर किमान 150 कोटी रुपये खर्च येईल. एकाचवेळी तेवढा निधी उपलब्ध होणार नाही. टप्प्याटप्प्याने हे काम करणे योग्य होणार नाही. मात्र, तसे करावे लागेल, असेही राणे म्हणाले.

vishwajit rane On Bondla Wildlife Sanctuary
Goencho Taxi Patrao Scheme : ‘गोंयचो टॅक्सी पात्रांव’ योजनेअंतर्गत 100 लाभार्थ्यांना 'सीएनजी टॅक्सी'

आमदार क्रुझ सिल्वा यांनी प्रश्नोत्तर तासाला याविषयी प्रश्न विचारला होता. ते म्हणाले, लहानपणी बोंडला अभयारण्यातील प्राणिसंग्रहालय आकर्षण होते. आता तसे ते राहिले नाही. आता शाळांच्या सहलीही तेथे जात नाहीत. तेथे सरकारने लक्ष पुरवण्याची गरज आहे. बृहदआराखडा केला असेल तर त्यातील ठळक बाबी कोणत्या ते समजले पाहिजे.

त्यांना उत्तर देताना वनमंत्री म्हणाले, आपण मांडलेले मुद्दे बरोबर आहेत. १९६९ मध्ये प्राणिसंग्रहालय खुले केले तरी त्यात म्हणावी तशी प्रगती झालेली नाही. टप्प्याटप्प्याने हे काम करता येणार नाही. एकाचवेळी प्राणिसंग्रहालयाला नवे रूपडे द्यावे लागणार आहे. आम्ही याबाबत केंद्र सरकारच्या संपर्कात आहोत. एका वर्षात परिवर्तन करता येणार नाही.

vishwajit rane On Bondla Wildlife Sanctuary
Power Shutdown in Goa: दक्षिण गोव्यातील 'या' भागामध्ये रविवारी वीज पुरवठा खंडीत

प्राणी दत्तक योजना

प्राणी दत्तक योजनेसाठी फाउंडेशन स्थापन केले आहे. त्यातून कंपन्या सामाजिक दायित्व योजनेखाली वा समाजातील दानशूर व्यक्ती प्राणी दत्तक घेऊ शकतील. त्यांना प्राणी इतरत्र नेता येणार नाहीत. सरकारी महामंडळेही त्यात आपले योगदान देऊ शकतील, अशी माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com