HardipSingh Puri in Goa: केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदिपसिंग पुरी गोव्यात; स्मार्ट सिटीच्या कामांची घेतली माहिती

मुख्यमंत्र्यांचीही घेतली भेट
HardipSingh Puri in Goa
HardipSingh Puri in GoaDainik Gomantak

HardipSingh Puri in Goa: केंद्रीय गृहनिर्माण आणि अर्बन अफेयर मंत्री हरदिपसिंग पुरी यांनी सोमवारी गोव्यातील स्मार्ट सिटीबाबतच्या बैठकीला उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाचे पथक आणि काही खासदारही आले आहेत. या सर्वांनी राजधानी पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामांची माहिती घेतली.

HardipSingh Puri in Goa
Vadodara-Goa Flight: आता बडोद्यातुनही गोव्याला थेट विमानसेवा; गोव्यातून झाले पहिले उड्डाण

स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीत आयसीसीसी, पुर नियंत्रणाचे उपाय, बगिचे इत्यादींची कामे केली जात आहेत. या कामांची माहिती केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाच्या पथकाने घेतली. उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी मामू हागे यांनी या पथकाला सर्व माहिती दिली.

कंन्सल्टेटिव्ह कमिटी ऑफ स्मार्ट सिटीज या समितीत असणाऱ्या संसदेतील ज्येष्ठ सदस्यांनी ही माहिती घेतली.

या कमिटीच्या बैठकीतही मंत्री हरदिपसिंग पुरी सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. देशभरातील 100 शहरांची निवड करून स्मार्ट सिटी अंतर्गत त्यांचा विकास केला जात आहे.

HardipSingh Puri in Goa
Goa Woman Attacked: गोव्यातील महिला पत्रकाराला मनालीमध्ये गुंडांकडून मारहाण

स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्पांना यावेळी पथकाने भेट दिली. पर्यटक आणि स्थानिक रहिवासी यांना या प्रकल्पांचा कसा फायदा होणार आहे, त्यांचे जीवन यामुळे कशापद्धतीने बदलणार आहे, याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, मंत्री हरदिपसिंह पुरी यांनी गोव्यातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचीही भेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com