Vadodara-Goa Flight: आता बडोद्यातुनही गोव्याला थेट विमानसेवा; गोव्यातून झाले पहिले उड्डाण

आठवड्यातून तीन दिवस उड्डाणे; बडोद्यातील प्रवाशांनी व्यक्त केला आनंद
Vadodara-Goa Flight
Vadodara-Goa FlightDainik Gomantak
Published on
Updated on

Vadodara-Goa Flight: गुजरातमधील अहमदाबाद येथून गोव्याला थेट विमानसेवा सुरू झाली आहे. त्यानंतर आता गुजरातमधील बडोदा शहरातूनही गोव्याला थेट विमानसेवा सुरू झाली आहे. गोव्यातून पहिली फ्लाईट बडोदा विमानतळावर आज, सोमवारी उतरली.

बडोदा विमानतळावर दीप प्रज्वलन करून आणि केक कापून या फ्लाईटला सुरवात झाल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी बडोद्याच्या खासदार रंजनबेन भट्ट या प्रमुख उपस्थित होत्या.

उत्तर गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही उड्डाणे असणार आहेत. आठवड्यातील तीन दिवस ही फ्लाईट असणार आहे.

Vadodara-Goa Flight
Goa Woman Attacked: गोव्यातील महिला पत्रकाराला मनालीमध्ये गुंडांकडून मारहाण?

सोमवार, शुक्रवार आणि रविवारी फ्लाईट क्रमांक 6E 6936 बडोद्यातून सकाळी 11:40 वाजता उड्डाण करेल. ते मोपा विमानतळावर दुपारी सव्वा एक वाजता उतरेल.

तर मोपा विमानतळावरून दर सोमवारी, शुक्रवारी आणि रविवारी फ्लाईट क्रमांक 6E 6935 सकाळी 09:35 मिनिटांनी उड्डाण करेल तर बडोद्यात 11:10 वाजता उतरेल.

खा. रंजनबेन भट्ट म्हणाल्या की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांसाठी रस्ते, रेल्वे, विमान प्रवास स्वस्त आणि सुलभ केला आहे. कोविड काळात बडोदा विमानतळावरून अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. नंतरच्या काळात पुन्हा त्यातील काही उड्डाणे सुरू झाली होती.

परंतु, गोवा-बडोदा फ्लाईट मात्र अद्याप पुन्हा सुरू झालेली नव्हती. ती आजपासून सुरू करण्यात आली आहे. नागरिकांच्या मागणीनंतर मी नागरी उड्डयण मंत्र्यांकडे तशी मागणी केली होती. इंडिगो एअरलाईन्सकडेही तशी मागणी केली गेली होती.

Vadodara-Goa Flight
Goa OYO Index: गोवा, मनाली ठरली फेव्हरिट टुरिस्ट डेस्टिनेशन; 'ओयो'च्या सर्व्हेतील माहिती

बडोद्यातील प्रवाशांनी याचा आनंद व्यक्त केला आहे. कारण कनेक्टिंग फ्लाईटमुळे बडोद्याहून गोव्यात यायला सहा तास लागायचे, पण आता थेट फ्लाईट सुरू झाल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.

आता विमानासाठी अहमदाबादला जावे लागणार नाही. खूप खर्च त्यामुळे वाचणार आहे. पैशांची बचत होणार आहे, अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, बडोदा हा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुर्वीचा मतदारसंघ आहे. २०१४ मध्ये जेव्हा मोदींनी लोकसभा निवडणूक लढविण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी गुजरातमधील बडोदा हा मतदारसंघ निश्चित केला होता.

तसेच उत्तर प्रदेशातील वाराणसीमधूनही त्यांनी निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणांहून निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी बडोद्याच्या जागेवरून खासदारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतरच्या निवडणुकीत मोदी केवळ वाराणसीतून निवडणुकीला उभे होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com