I League Football
I League FootballDainik Gomantak

I League Football: धेंपो क्लबने एफसी गोवास नमविले

द्वितीय विभाग आय-लीग; उत्तरार्धात दोन्ही संघांचे सामर्थ्य दहा खेळाडूंवर
Published on

I League Football : धेंपो स्पोर्टस क्लबने द्वितीय विभाग आय-लीग फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या विजयाची नोंद करताना एफसी गोवा डेव्हलपमेंट संघावर 3-0 अशा फरकाने मात केली. ‘ड’ गटातील सामना शनिवारी नागोवा पंचायत मैदानावर झाला.

(Dempo Sports Club defeat FC Goa)

सामन्याच्या उत्तरार्धात एफसी गोवा आणि धेंपो क्लबला दहा खेळाडूंसह खेळावे लागले. एफसी गोवाच्या व्हेलरॉय फर्नांडिस याला 50 व्या मिनिटास रेड कार्ड मिळाले, त्यानंतर 51 व्या मिनिटास सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे धेंपोच्या गौरव काणकोणकर याला मैदान सोडावे लागले.

मात्र त्यापूर्वीच धेंपो क्लबने दोन गोलची आघाडी घेतली होती. हे दोन्ही गोल करणारा बेनेस्टन बार्रेटो धेंपो क्लबच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने अनुक्रमे 12 व 36 व्या मिनिटास गोल नोंदविला. अन्य एक गोल महंमद अली याने 66 व्या मिनिटास केला.

I League Football
Bandodkar T-20 League: विजय नोंदवूनही धेंपो क्लब ‘आऊट’, पणजी जिमखाना ‘ब’ गटात अव्वल स्थानी

धेंपो क्लब संघ आता स्पर्धेत सात सामने खेळला असून तीन विजय, दोन बरोबरी व दोन पराभव या कामगिरीसह त्यांचे 11 गुण झाले आहे. एआरए एफसी व अंबरनाथ युनायटेड या संघांचेही तेवढेच गुण आहेत.

गोलसरासरी +2 अशी कमी असल्यामुळे गोव्यातील संघ पाच संघाच्या गटात तिसऱ्या स्थानी आहे. एफसी गोवास चौथा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सहा सामने खेळल्यानंतर त्यांचे चार गुण कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com