CM Pramod Sawant: लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात थेट रक्कम; गोवा सातवा

राज्याच्या अर्थव्यवस्थेत ९.७३ टक्के वाढ असणार
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

राज्य सरकारने देशात लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा करणे सर्वप्रथम सुरू केले असले तरी आता राज्याचा असे करण्यात सातवा क्रमांक लागतो.

खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी (ता.२८) गांधीनगर-गुजरात येथील 26व्या पश्चिम विभागीय परिषदेत बोलताना ही कबुली दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते.

मुख्यमंत्री म्हणाले, निरंतर विकास निर्देशांकात राज्याने ७२ गुण कमावत देशात चौथा क्रमांक पटकावला आहे. स्वच्छ पाणी व स्वच्छता तसेच परवडण्याजोगी ‘स्वच्छ ऊर्जा’ या प्रकारात राज्याने पहिला क्रमांक पटकावल्याचे निती आयोगाच्या अहवालात नमूद केले आहे.

CM Pramod Sawant
GHRDC Recruitment: कंत्राटी 370 पदांसाठी हजारो युवकांची झुंबड; प्रशासन हतबल

मुख्‍यमंत्री म्‍हणाले,

  1. गेल्या वर्षी राज्याच्या अर्थव्यवस्थेची वाढ ९.११ टक्के होती तर यंदा ती वाढ ९.७३ टक्के असेल.

  2. दरडोई सकल उत्पादन ५.७५ लाख रुपये असेल. प्रत्येक गावात बॅंक सुविधा असणारे हे एकमेव राज्य आहे.

  3. स्वयंपूर्ण गोवा मोहिमेमुळे केंद्र सरकारच्या सात योजनांचे पूर्ण लक्ष्य गाठण्यात आले; तर ३ योजनांचे लक्ष्य ९० टक्क्यांहून अधिक गाठण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Warkari Tradition History Before Portuguese
Goa CM Pramod Sawant
Dhangar Community ST Status
home minister amit shah reviews goa st reservation file
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com