Yoga: 'सूर्याची उपासना ही आपली परंपरा असून योगात कल्याणाची भावना'

योग आणि आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली अनमोल भेट असून त्यामध्ये विश्वकल्याणाची भावना आहे, असे प्रशंसोद्‍गार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी काढले.
Goa News | Shripad Naik
Goa News | Shripad NaikDainik Gomantak
Published on
Updated on

Yoga: ''सर्वे सन्तु निरामया’ ही संकल्पना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगाचा लौकिक जगभर पोहचवला आहे. योग आणि आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली अनमोल भेट असून त्यामध्ये विश्वकल्याणाची भावना आहे, असे प्रशंसोद्‍गार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी काढले.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हरिश्रध्दानंद सरस्वती स्वामी आणि त्यांच्या शिष्यांनी स्थापन केलेल्या श्रध्दायोग गुरुकुलचे उद्‍घाटन केल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री रोहन खंवटे उपस्थित होते.

पेन्ह द फ्रान्सचे सरपंच स्वप्नील चोडणकर, पंच सदस्य सिध्देश नाईक व्यासपीठावर होते. तसेच निवृत्त न्यायाधीश शेट्ये, सुभाष वेलिंगकर, रा.स्व.संघाचे संघसंचालक राजेंद्र भोबे उपस्थित होते. संस्थेचे कार्य उत्तम चालावे, अशा शुभेच्छाही मंत्री नाईक यांनी दिल्या.

पर्यावरण मंत्री रोहन खंवटे यांनी श्रध्दायोग गुरुकुलचे कार्य पर्वरी पुरते मर्यादित न राहता संपूर्ण गोमंतकास त्याचा लाभ होईल असा आशावाद प्रकट केला.

Goa News | Shripad Naik
Goa Artist: हिरांची झाडू विणणे तुकारामांचे कलाकौशल्यच!

देवभूमी गोमंतकात योग प्रसाराचे उद्दिष्ट बाळगून स्वामीजी गेली पांच वर्षे कार्यरत आहेत,असे सुहास सरदेसाई यांनी सांगितले.

डॉ. गोविंद काळे यांनी सांगितले, की अर्जुनाला जसे ''तस्माद् योगी भव अर्जुन'' असे मार्गदर्शन प्रत्यक्ष रणभूमीवर केले.तशी राष्ट्राला योगेश्र्वर कृष्णाची नितांत गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Vaidhriti Yoga 2026
Damu Naik
Akshat Naik Death Case
MGP political controversy
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com