Shri Damodar Devsthan : फातोर्डा येथील श्री दामोदर देवस्थानतर्फे वार्षिकोत्सवाला सुरवात

हजारो भाविकांची उपस्थिती: मुख्यमंत्री सावंत, विजय सरदेसाईंनीही घेतले दर्शन
Shri Damodar Devsthan
Shri Damodar Devsthan Dainik Gomantak

फातोर्डा येथील दामोदर लिंगावर श्री दामोदर देवस्थानतर्फे शनिवारपासून वार्षिकोत्सवाला सुरवात झाली. 24 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या उत्सवात धार्मिक कार्यक्रमांबरोबच श्री सत्यनारायण महापूजा, नाटकांचे प्रयोग व ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले. दुपारी झालेल्या श्री सत्यनारायण महापूजेच्या यजमानपदाचा मान सौ. व श्री प्रेमानंद कारेकर यांना प्राप्त झाला. पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी देवाचे दर्शन घेतले.

त्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, भाजपचे सरचिटणीस दामू नाईक, योगिराज दिगंबर कामत यांचाही समावेश होता. मुख्यमंत्र्यांनी नंतर महाप्रसादाचाही लाभ घेतला.

Shri Damodar Devsthan
Valpoi News: लोकसंस्कृतीचे संवर्धन करणे विद्यार्थ्याच्या हाती- प्राचार्य रियाज जमादार

रात्री 8 वाजता सुरू झालेला महाप्रसाद रात्री 11.30 ते 12च्या सुमारास संपला. जवळ जवळ अडीच हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, असे देवस्थान समितीचे अध्यक्ष अमरेश नाईक यांनी सांगितले.

रविवारी ‘फटींग नंबर१’ नाटकाचा प्रयोग झाला. उद्या सोमवारी ‘दगडू सावधान’ हा नाट्यप्रयोग व 24 रोजी मंगळवारी ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच दिवशी संध्याकाळी 4 वाजता दुसरी श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे.

Shri Damodar Devsthan
Ponda News: बाळ सप्रे यांचे साहित्य वास्तवाशी निगडीत- कालिदास मराठे

दोन वर्षांत सभागृह- अमरेश नाईक, अध्यक्ष

श्री दामोदर लिंग मंदिराच्या बाजूला असलेल्या जागेत देवस्थान समितीचा दोन सभागृहे बांधण्याचा संकल्प आहे, असे अध्यक्ष अमरेश नाईक यानी सांगितले. अंदाजे 3 कोटी रुपये खर्चाच्या योजनेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असुन दोन वर्षांत हे सभागृह पूर्ण होणार असल्याचा विश्र्वास नाईक यांनी व्यक्त केला. या सभागृहाला अंडरग्राऊंड पार्किंगची व्यवस्था केली जाईल. तळमजल्यावर रंगमंच असलेले सभागृह व पहिल्या मजल्यावर लग्न कार्य किंवा इतर कार्यासाठी आणखी एक सभागृह व समितीची कचेरी असेल. या सभागृहात खाली व वर मिळून अंदाजे एक हजार लोकांची व्यवस्था असेल, असेही अमरेश नाईक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com