Calangute Beach: पर्यटकांना त्रास देणाऱ्या दलालांना पोलिसांनी शिकवला धडा, कळंगुट येथे 25 जणांना ताब्यात
Calangute BeachDainik Gomantak

Calangute Beach: गोवा पोलिसांचं 'ऑपरेशन दलाल', कळंगुटला 25 जण ताब्यात

Calangute Goa Beach: पोलिसांनी २५ दलाल आणि एजंट्ना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
Published on

म्हापसा: राज्यात सध्या पर्यटन हंगाम तेजित आहे. देश - विदेशातील पर्यटक नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात दाखल झाले आहेत. कळंगुट, बागा, कांदोळी, सिक्वेरी, वागातोर, मिरामार, केरी, कोलवा यासारखे राज्यातील प्रमुख समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. दरम्यान, या पर्यटकांना त्रास देणाऱ्या बेकायदेशीर एजंटची संख्या देखील वाढली आहे. अशा बेकायदेशीर दलालांवर कळंगुट पोलिसांनी कारवाई केली आहे.

कळंगुट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कळंगुट पोलिसांनी अवैध पद्धतीने कार्यरत असलेल्या दलाल आणि एजंटच्या विरोधात कारवाई केली. पोलिसांनी २५ दलाल आणि एजंट्ना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

Calangute Beach: पर्यटकांना त्रास देणाऱ्या दलालांना पोलिसांनी शिकवला धडा, कळंगुट येथे 25 जणांना ताब्यात
Saint Francis Xavier Exposition: संत झेवियरच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी; अवशेष दर्शनाची वेळ 2 तासांनी वाढवली

राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिस कटीबद्ध असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस कार्यरत आहेत. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात येणाऱ्या पर्यटकांना त्रास देणाऱ्या देणाऱ्या दलालांच्या बंदोबस्त करण्यासाठी पोलिस २४ तास कार्यरत आहेत. तसेच, पर्यटकांनी देखील अशा घटनांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com