Goa Unemployment: 'बेरोजगारीचा प्रश्न सोडवला नाही तर गोव्याची अवस्था..'; शेर्पा अमिताभ यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच दिला इशारा

Sherpa Amitabh Kant: राज्यातील बेरोजगारीचा दर देशात सर्वाधिक आहे, जो ८.५ टक्के आहे, तर राष्ट्रीय सरासरी ३.२ टक्के आहे. विशेषतः १५-१९ वयोगटात बेरोजगारीचा दर १९.९ टक्के आहे.
Sherpa Amitabh Kant, CM Pramod Sawant
Sherpa Amitabh Kant, CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Unemployment Rate In Goa

पणजी: राज्यातील बेरोजगारीचा दर देशात सर्वाधिक आहे, जो ८.५ टक्के आहे, तर राष्ट्रीय सरासरी ३.२ टक्के आहे. विशेषतः १५-१९ वयोगटात बेरोजगारीचा दर १९.९ टक्के आहे, जो चिंताजनक असून देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर हे प्रश्न सोडवले नाहीत तर गोवा पंजाबसारख्या स्थितीत जाईल, असा इशारा भारताचे शेर्पा अमिताभ कांत यांनी दिला.

गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने आयोजित केलेल्या लीडर्स @ गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज या कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि चेंबर्सचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांच्या उपस्थितीत कांत यांनी ही मांडणी केली. ते म्हणाले, २०१९ पासून गोव्यातील थेट परदेशी गुंतवणूक केवळ ०.०७ टक्के आहे, जे धोकादायक आहे. तसेच २०२३ मध्ये गोव्याचा देशाच्या एकूण निर्यातीतील वाटा केवळ ०.५ टक्के आहे. उद्योगासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी कायदे, नियम आणि नियमांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

पर्यटन वृद्धीसाठी काही उपाय

केरळने ५० अमेरिकी डॉलर प्रति रात्र असलेल्या पर्यटन स्थळाला ५०० अमेरिकी डॉलरपर्यंत नेले. गोव्यात अधिक चांगल्या पर्यटन संधी आहेत. उच्चभ्रू पर्यटकांना आकर्षित करणे आवश्यक आहे.

गोवा स्टार्टअप्ससाठी आदर्श ठिकाण आहे. सर्व शाळांमध्ये स्टार्टअप संस्कृती विकसित करण्यासाठी साधने पुरवली जावीत. गणित आणि विज्ञान यामध्ये गोव्यातील विद्यार्थी मागे पडले आहेत. शिक्षणाच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करणे आवश्यक आहे. सामान्य वर्गातील डॉक्टरांची कमतरता ५१ टक्के आहे, तर सुपर स्पेशालिटी विभागात ही टक्केवारी ७० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही कर्मचारी कमी आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

भारत मोठी अर्थव्यवस्था

भारत २०२७ पर्यंत तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल. भारत डिजिटल पेमेंट्सच्या व्यवहारांमध्ये जगात आघाडीवर असून बँकिंग क्षेत्र नवीन पातळीवर पोहोचले आहे. मागील वर्षी ६ हजार इलेक्ट्रिक बस तयार करण्यात आल्या आणि येत्या काही वर्षांत एक लाख बस तयार करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. भारताने ४ कोटी नवीन घरे बांधली आहेत, जी ऑस्ट्रेलियासारख्या एका नवीन देशाएवढी आहे, असेही ते म्हणाले.

Sherpa Amitabh Kant, CM Pramod Sawant
Goa Cabinet Reshuffle: गोवा मंत्रिमंडळ फेरबदलाच्या हालचालींना वेग? 3 आमदार एका मंत्र्यासह CM सावंत दिल्लीत दाखल

... तर सकल राज्य उत्पादन १ लाख कोटींवर!

१ राज्याचे सकल राज्य उत्पादन सध्या ५४ हजार कोटी रुपये आहे. ज्यात मागील पाच वर्षांत केवळ २ टक्के वाढ झालीआहे. जर हा दर ६ टक्के झाला, तर सकल राज्य उत्पादन १ लाख कोटी रुपयांवर जाईल असे त्यांनी नमूद केले.

२ चेंबर्सचे महासंचालक संजय आमोणकर यांनी स्वागत केले. ललित सारस्वत यांनी कार्यक्रमाच्या उद्देशांवर प्रकाश टाकला आणि संदीप भांडारे यांनी आभार मानले. पर्यटन मंत्री रोहन खंवटे, वरिष्ठ सरकारी अधिकारी, उद्योजक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती आणि नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sherpa Amitabh Kant, CM Pramod Sawant
Budget 2025: गोव्याची केंद्राकडे ९,७०० कोटींची मागणी, पश्‍चिम घाट रक्षणासाठीही मागितला निधी

कांत म्‍हणाले...

गोवा देशातील सर्वोत्तम राज्य बनण्याची क्षमता ठेवते, असे सांगून ते पुढे म्हणाले की, प्रति व्यक्ती उत्पन्न देशातील सर्वाधिक असलेल्या गोव्यात १० टक्के वाढीचा दर साध्य केल्यास हे उत्पन्न प्रति वर्ष ३० लाख रुपये होऊ शकते.

त्‍यासाठी काही कठोर वास्तव समजून घेतले आणि सुधारले जाणे आवश्यक आहे. गोव्याने स्वतःला हरित राज्य बनवण्यासाठी काम करावे. सर्व वाहतूक विद्युत वाहनांद्वारेच व्हावी. २०५० पर्यंत १०० टक्के नवीकरणीय ऊर्जा साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com