Underground Power Lines : सुर्लामध्ये भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामाला मंजुरी

कामाला मंजुरी : आमदार डॉ. राणे यांच्या प्रयत्नांना यश
Mla Divya Rane
Mla Divya RaneDainik gomantak
Published on
Updated on

Underground Power Lines : पिसुर्ले, चोर्लाघाट क्षेत्रात असलेला सुर्ला गाव लवकरच भूमिगत वीजवाहिन्यांनी जोडण्यात येणार आहे. आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या प्रयत्नामुळे ठाणे डोंगर्ली पंचायत क्षेत्रात मोडणाऱ्या या गावात सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून भूमिगत वीज वाहिनी घालण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.

त्यामुळे वारंवार खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येतून येथील नागरिकांना सुटका होणार आहे.सुर्ला गाव गोव्याचे माथेरान म्हणून ओळखला जातो.

त्यामुळे शेकडो निसर्गप्रेमी तसेच पर्यटक तेथे भेट देतात. माजी आमदार तथा माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्या प्रयत्नामुळे ठाणे गावातून खांब उभारून सुर्ला गावाला वीज जोडणी दिली होती.

ही वाहिनी पूर्ण जंगल भागात असल्याने वाहिन्यांवर झाडेझुडपे पडून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे येथील नागरिकांना काळोखात दिवस काढावे लागत होते.

या समस्येची दखल घेउन आमदार डॉ. दिव्या राणे यांनी सरकार दरबारी सातत्याने प्रयत्न करून ठाणे डोगुर्ली ते सुर्लापर्यंत ११ केव्ही वाहिनीला भूमिगत जोडणी देण्यास मंजुरी मिळवली.

या कामावर ४,८३,४५,८४९ रुपये खर्च येणार आहे. प्रभू एंटरप्राइजेस या कामाचे कंत्राट मिळाले असून लवकरच या कामाचा शुभारंभ होणार आहे.

Mla Divya Rane
Goa Updates: ताळगावमधील कृष्णा कुट्टीकर खून प्रकरणातील चारही आरोपींची निर्दोष मुक्तता

गावातील समस्या सोडवण्यास प्राधान्य : दिव्या

आमदार डॉ. दिव्या राणे यांनी या कामाला मंजुरी दिल्याबद्दल सरकार तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वीज मंत्री सुदिन ढवळीकर, वीज खात्यांचे वरिष्ठ अधिकारी यांना धन्यवाद दिले आहेत. पर्ये मतदार संघातील सर्व गावातील समस्या सोडवण्यास आपले प्राधान्य राहील, असे राणे यांनी सांगितले.

सुर्लात समाधान

आमदार डॉ. दिव्या राणे यांनी तातडीने लक्ष घालून गेल्या कित्येक वर्षांपासून भेडसावत आलेली वीज समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सुर्लातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच आमदार डॉ. दिव्या राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com