२०१९ मध्ये ताळगाव येथील कृष्णा कुट्टीकर खूनप्रकरणातील चारही आरोपी जॅक ऑलिव्हेरा, कमरेश कुंडईकर, मनिष हडफडकर व गौरीश गावस बांदोडकर यांना पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.
आरोपींनी कृष्णा कुट्टीकर याच्यावर तलवारीने वार केला होता. त्यात त्याचे मनगट तुटले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता.
पोंबुर्फा-ओळावली ग्रामस्थांनी रविवारी एकमताने एकोशी येथील वादग्रस्त रस्त्याच्या बांधकामासाठी दिलेल्या परवानगी रद्द करण्याचा ठराव केला. जो २००९मध्ये पंचायत मंडळाने मंजूर केला होता. तसेच नगर नियोजन, वन व सीआरझेडला पत्र लिहिण्याचे ठरविले. याशिवाय गामस्थांनी मेगा प्रकल्पांना परवानगी न देण्याचा तसेच जंगल व टेकड्यांच्या र्हास होऊ न देण्याचा ठराव घेतला.
ग्रामसभा व्हिडिओग्राफी, कचरा कर, हाऊस टॅक्स तसेच मंगेशी महामार्ग नजिक बेकायदा पोलजी मेगा कन्स्ट्रक्शन विषयावरून वेलिंग प्रियोळ कुंकळ्ये पंचायतीची रविवारी झालेली ग्रामसभा बरीच तापली.
ग्रामसभा व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हावी ही ग्रामस्थांची मागणी पंचायत मंडळाकडून नाकारण्यात येत होती, परंतु, पंचायतीचे ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते गौरेश गावडे यांनी डायरेक्टरेट ऑफ पंचायतचे सह संचालक पांगम यांनी स्वतः आपल्या तोंडून, कोणीच ग्रामस्थांना चित्रीकरण करण्यास अडवू शकत नाही असे म्हटल्याचे यावेळी सांगण्यात आले.
गोव्यात आयोजित 37व्या राष्ट्रीय खेळ 2023 मधील हॉकी स्पर्धा सोमवारपासून सुरू झाली. 7 नोव्हेंबरपर्यंत खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत आज हॉकी झारखंडच्या महिला संघाने यजमान गोव्याचा 4-0 असा पराभव केला. पेडे, क्रीडा संकुलातील हॉकी मैदानावर हा सामना रंगला.
मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला असून, यात एक महिला ठार झाली आहे. तर, अन्य सात जण जखमी झाले आहे. जखमींना वैद्यकीय उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आहे.
रविवार 29 ऑक्टोबर रोजी महाड तालुक्यातील नांगलवाडी परिसरात पिकअप टेम्पो दुभाजकाला धडकून सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
कुलवंती अशोक राऊत (वय 60, रा. मुठवाली महाड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
तर, सुहास मधुकर साळवी, अरुण लक्ष्मण चोरगे, ज्ञाननंदकुमार मेहता, नंदिनी नंदकुमार पालव, शीतल सुभाष राऊत, अमोल अनंत रेशीम सर्व राहणार मूठवली महाड हे सहाजण जखमी झाले आहेत.
आशियाई क्रीडा स्पर्धेत दुखापतीमुळे चमक दाखवू न शकलेल्या मॉडर्न पेंटॅथलॉनपटू मयांक चाफेकरने आगामी ऑलिम्पिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये सहा सुवर्ण आणि एक कांस्य अशी लक्षवेधी कामगिरी करणा-या मयांकचा महाराष्ट्राच्या पदकभरारीत महत्त्वाचा वाटा आहे. नुकत्याच चीनमध्ये झालेल्या एशियाडमध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
ट्रेड लायसनशिवाय चालणाऱ्या वास्कोतील २ दुकानांना मुरगांव पालिकेने ठोकले टाळे. आणखीनही काही दुकानांना ट्रेड लायसन नसल्याची नगराध्यक्ष गिरीश बोरकरांची माहिती. २५० पेक्षा जास्त दुकानांची लायसन्स फी भरण्यात आलेली नाही.
बायथाखोल - बोरी येथे रविवारी रात्री हिट अॅन्ड रनचा प्रकार समोर आला आहे. तर सोमवारी सकाळी संजीवनी साखर कारखान्यासमोर तीन मालवाहू ट्रकचा अपघात झाला आहे. या दोन्ही अपघातांमध्ये चालक जखमी झाले असून त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरु आहेत.
डिचोलीतील सामाजिक आरोग्य केंद्रात आवश्यक डॉक्टर आदी सुविधा उपलब्ध करा. काँग्रेसची मागणी. आरोग्याधिकाऱ्यांना निवेदन सादर. सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशारा.
गोवा हँडबॉल असोसिएशनने याचिका मागे घेतली. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या स्पर्धा आयोजन तात्रिक समितीने गोव्यात राष्ट्रीय स्पर्धेत हँडबॉल व बीच हँडबॉल खेळासाठी संघ निवडीस दिली परवानगी. त्यासदर्भातील माहिती असोसिएशचे वकील गौरांग पाणंदीकर यांनी दिली.
म्हापसा पेडे मैदानावर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या हॉकीच्या सामन्यांना सुरुवात. हळदोणेचे आमदार कार्लुस फेरेरा आणि व्हेन्यू कमांडंट सुधीर केरकरांच्या उपस्थितीत शुभारंभ.
राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असताना 500 ते 600 कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय स्पर्धा राज्यात भरवणे, हे गोव्यासारख्या छोट्या राज्यासाठी हितावह नाही. कारण हा संपूर्ण खर्च राज्य सरकारला सोसावा लागेल, असे मत आर्थिक क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले आहे.
गोव्यातील स्पर्धेसाठी, स्पर्धा नियोजनामध्ये सुरुवातीला 300 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला होता. राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पात अडीचशे कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. मात्र हा खर्च 600 कोटी रुपये पर्यंत जाईल, असा प्राथमिक अंदाज आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गोव्यात दाखल झाले आहेत. मंत्री मॉविन गुदिन्होंनी केलं राजनाथ सिंहांच दाबोळी विमानतळावर स्वागत.
३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जलतरणात महिलांच्या ४ बाय १०० मीटर मेडली रिलेत गोव्याचा संघ अंतिम फेरीत. संघात निरंजनी बोर्डे, श्रीजा गाड, सौरभी नाईक, अलाका ब्रिटो यांचा समावेश.
पोलिस खात्यातील उपनिरीक्षक प्रदीप कुबल यांचे डिचोलीत निधन. मॉर्निंग वॉकवरून परतताना कोसळले. हृदय विकाराचा झटका. एक उत्कृष्ट नाट्य आणि भजनी कलाकार म्हणून परिचीत होते. मूळ खोकरल-महाराष्ट्र येथील मयत कुबल कुटुंबासहित डिचोलीत स्थायिक झाले होते
BITS पिलानी के के बिर्ला गोवा कॅम्पसची 20 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने गोव्यातील शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना BITS पिलानी कॅम्पस खुला केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना येथील सुविधांचा अनुभव घेण्यासह आणि संशोधन प्रकल्प पाहता येणार आहेत.
20 वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर संस्था वर्षभरात विविध कार्यक्रम आयोजित करणार आहे. 1 नोव्हेंबर ते 31 ऑक्टोबर 2024 या काळात यात सहभागी होता येईल.
कधी काळी गल्ली आणि रस्त्यावर खेळल्या जाणाऱ्या लगोरी खेळाचा ऑलिम्पिकमध्येही समावेश करण्यात आला आहे. याला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी, झारखंडच्या पलामूच्या लगोरी असोसिएशनचे सचिव सुमित वर्मन 37 राष्ट्रीय खेळांमध्ये लगोरी खेळाला प्रोत्साहन देतील. 37 राष्ट्रीय खेळांमध्ये भाग घेण्यासाठी पलामूचा खेळाडू प्रथमच गोव्यात येणार आहे.
तळागाळातील मराठमोळ्या युवा शिलेदारांनी प्रचंड मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर सर्वोत्तम कामगिरीतून महाराष्ट्र संघाचे ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचे शतक साजरे केले. आपल्या पदकांची मोहीम अबाधित ठेवताना महाराष्ट्र संघाने रविवारी १०६ पदकांचा पल्ला गाठला.
यामध्ये ४६ सुवर्णांसह २९ रौप्य आणि ३१ कांस्यपदकांचा समावेश आहे. राज्यातील ४१ युवा शिलेदार हे सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. महाराष्ट्र संघाने या शतकी पदकांसह पदकतालिकेतील आपले अव्वल स्थान अधिक मजबूत केले.
पेंचाक सिलाट खेळातील करिनाचे सोनेरी यश गोव्यासाठीही ऐतिहासिक ठरले. काही महिन्यांपूर्वीच ‘पेंचाक सिलाट’ खेळात दाखल झालेल्या करिनाने भरपेट आणि आवडीचे अतिखाणे टाळले. सारे लक्ष खेळावर केंद्रित केले आणि त्याद्वारे ती विजेतेपदापर्यंत प्रगती साधू शकली.
करिनाची आई सेबत या खूपच आनंदित होत्या. त्यांनी सांगितले, की ‘करिना फूडी आहे. मात्र ‘पेंचाक सिलाट’ शिबिरात दाखल झाल्यानंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक जिंकायचेच या जिद्दीने ती पेटून उठली. आपल्या खाण्याच्या सवयींवर तिने कठोर बंधने आणली. आहाराच्या बाबतीत ती काटेकोर राहिली. करिनाचे वडील राजेश शिरोडकर हे ‘रियल ग्रुप’चे संचालक आहेत.
गोव्यात सुरु असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भ्रष्टाचाराचा आरोप विरोधकांनी केला असताना, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी गोवा ऑलिम्पिक संघटनेने (GOA) स्पर्धेच्या तयारीसाठी त्यांना विश्वासात घेतले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
फातोर्डा मैदानावर गुरुवारी 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी मैदानातून स्वयंपूर्ण फेरीतून प्रेक्षकांना अभिवादन करण्यात आले. स्वयंपूर्ण फेरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजप गोवा युनिटचे अध्यक्ष व राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांना स्थान देण्यात आले होते.
स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत कदंब परिवहन महामंडळाला पहिल्या टप्प्यात मिळालेल्या 22 ईव्ही बसगाड्या पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहेत.
राजधानीतील सात मार्गांवर या बसगाड्या धावणार आहेत, तर दुसरीकडे महामंडळाने सुरू केलेल्या ‘माझी बस योजने’ला उत्तर गोव्यातून काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती महामंडळाचे चेअरमन उल्हास तुयेकर यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.