Goa Crime: 50 हजारांसाठी काकाने केले पुतण्याचे अपहरण

मडगाव पोलिसांकडून संशयित जेरबंद
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Crime: जुन्या वादातून आपल्याच सात वर्षीय पुतण्याचे अपहरण करून सख्ख्या भावाकडून 50 हजारांची खंडणी मागितल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. या प्रकरणी मडगाव पोलिसांनी काही वेळातच सुनील पुजारी (28, रा. मिलिट्री कॅम्प, रावणफोंड) याला अटक करून चिमुकल्याची सुखरूप सुटका केली.

सुनीलचे मोठा भाऊ रवी पुजारी याच्यासोबत भांडण झालेले असून ते दोघेही वेगवेगळे राहतात. त्याच वादातून रविवारी संध्याकाळी सुनीलने रवीच्या मुलाचे मुरुगन मंदिराकडून अपहरण केले. त्यानंतर मुलाला सोडायचे असल्यास 50 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

रवीने तत्काळ पोलिसांनी कळविले असता पोलिसांनी त्याला काही वेळातच जेरबंद करत मुलाला सोडविले. सुनीलकडून पोलिसांनी एक स्कूटर जप्त केली असून ती चोरीची आहे. त्याची पार्श्‍वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Goa Crime
Fire In Goa: पाच ठिकाणी अग्नितांडव कायम

अखेर ‘ती’ मुलगी सापडली

वास्को पोलिसांनी सात वर्षीय बेपत्ता मूकबधीर मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. पोलिसांना ही मुलगी प्यूमा शोरूमजवळच्या परिसरात सापडली. तिच्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी तिचा फोटो पोलिसांनी समाजमाध्यमात प्रसारित केला होता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mapusa Kidnapping Cases 2026
Clay Ganesh Idol Environmental Benefits
Cyber Fraud
Margao Lab Owner Kidnapping
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com