Fire In Goa: पाच ठिकाणी अग्नितांडव कायम

प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न : साट्रेतील जळकी लाकडे विझविण्याचे वन खात्यासमोर आव्हान
Fire in Goa
Fire in Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Forest Fire: दहा दिवसांपूर्वी सत्तरीच्या साट्रे परिसरात लागलेली आग आता परिसरातील अनेक जंगलांत पसरली आहे. ती विझविण्यासाठी वन खात्याबरोबर नौदल, हवाई दलाचे प्रयत्न सुरूच आहेत. जंगलांमध्ये वाळलेली आणि या वणव्यामध्ये पेटलेली लाकडे विझविणे हे वन खात्यासमोरील मोठे आव्हान आहे.

या लाकडांमध्ये राहिलेली आग वाऱ्यांमुळे पुन्हा भडकत आहे. त्यामुळे अशा प्रकारची लाकडे शोधून ती विझविली जात आहेत. त्यामुळे आज ७ ठिकाणी नियंत्रण मिळविले असून अद्याप ५ ठिकाणी आग सुरूच आहे.

वन खात्याचे उत्तर गोवा उपवनसंरक्षक आनंद जाधव यांनी सांगितले, वन खात्याने आपली कार्यपद्धती बदलली असून ज्या ठिकाणी वाळलेली पण आग लागलेली मोठी लाकडे आहेत ती पूर्णतः विझविणे याला प्राधान्य आहे.

हा भाग आगीच्या प्रकोपाखाली

1) सुर्ला मोले-1 - सरकारी वन

2) सुर्ला मोले-2 - सरकारी वन

3) पोट्रे नेत्रावळी - सरकारी वन

4) कोपार्डे बीट, - सरकारी वन

5) शिगाव बीट - सरकारी वन

या आगी नियंत्रणात-

कुर्टी बीट : सरकारी वन

पालये : सरकारी वन

गुळे : सरकारी वन

बोरी : सरकारी वन

पागुची डोंगर : सरकारी वन

कुमारी नेत्रावळी : सरकारी वन

पालये : सरकारी वन

वणवा पेटून बेचिराख झालेले सर्व जंगल क्षेत्र विकास निषिद्ध क्षेत्र जाहीर करा आणि त्या जागेचे रूपांतर करण्यास बंदी आणा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

हे जंगल पुन्हा वाढविण्यासाठी प्रयत्न करा आणि त्यासाठी खास निधीची तरतूद करा, अशी मागणी करत ही आग कशी लागली याची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमा आणि त्याद्वारे आगीच्या सर्व घटनांची चौकशी करा असे म्हटले आहे.

गोव्यात मागच्या 10 वर्षांत 15 हेक्टर किनारपट्टी नष्ट झाली असल्याचा जो इस्रोने अहवाल दिला आहे, त्याची कारणे शोधून काढण्यासाठी शास्त्रीय अभ्यास करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

फोंडकुले जंगलात वणवा : फोंडकुले-सावर्डे येथील जंगलात सोमवारी संध्याकाळी आग लागल्याचे समोर आले. ही आग विझविण्यासाठी दलाचे जवान व काही स्थानिक प्रयत्न करत आहेत. इतर ठिकाणी जंगलातील आगीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. वणवा पुन्हा लागण्याची शक्यता असलेल्या परिसरात अग्निशमन दलाचे अतिरिक्त जवान तैनात आहेत.

Fire in Goa
Goa Petrol-Diesel Price : गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या

पॉली हाऊसला आग, 33 लाखांचे नुकसान

केरी-आगोंद येथील शामराव देसाई यांच्या पॉलीहाऊसला आग लागून 33 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. शनिवारी (ता. 11) संध्याकाळी ही आग लाग लागली असावी. यात पॉलीहाऊस आणि त्यातील ऑर्किडची रोपटीही जळून खाक झाली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Fire in Goa
Save Mhadai Save Goa: मुख्यमंत्र्याकडून कर्नाटकात प्रचार अयोग्य

वाढते तापमान, वारे यामुळे पुन्हा भडकते आग

संध्याकाळच्या सुमारास सुटणारा वारा, राज्यात वाढलेले तापमान आणि कमी झालेली आद्रता यामुळे विझविलेली आग पुन्हा भडकत आहे. याला वाळलेली मोठी लाकडे कारणीभूत आहेत. या लाकडांमध्ये राहिलेली थोडी आग पुन्हा भडकते आणि मग पुन्हा वणवा सुरू होतो. यामुळे वनखात्याने याकडे लक्ष केंद्रित केले आहे.

हवाई दल सक्रिय : अभयारण्य आणि वनखात्याच्या जमिनीत लागलेली आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी हवाई दलाची दोन्हीही हेलिकॉप्टर्स आज दिवसभर कार्यरत होती. याशिवाय वनखात्याच्या ग्राउंड टीमकडून आग विझव्ण्याचे काम सुरू होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com