Goa Maharashtra: हा रस्ता बांधला कोणी? गोव्यातून महाराष्ट्राला जोडणारा डांबरी मार्ग तयार, सीमेवर अवैध रस्त्याचा सावळा गोंधळ

Goa Maharashtra Border: महाराष्ट्रातून अनेक प्रकारे बेकायदेशीर वाहतूक होण्याची भीती देखील स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
Road between amadgaon and lafde
Road Connecting Goa and MaharashtraDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर एक अनोखा प्रकार उघडकीस आला आहे. डिचोलीतील लाटंबार्से पंचायत परिसरातील लाडफे गावातून महाराष्ट्रात जाणारा एक पक्का रस्ता बांधण्यात आला आहे. दरम्यान, हा रस्ता अवैध पद्धतीने बांधण्यात आला असून, तो कोणी बांधला? याबाबत कोणत्याच प्रशासकीय खात्याला माहिती कशी नाही? असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, लाटंबार्से पंचायतीत असणाऱ्या लाडफे गावातून महाराष्ट्रातील आमडगावपर्यंत पक्का डांबरी रस्ता बांधण्यात आला आहे. रस्त्याच्या बाजुला सुरक्षा भिंत आणि काही ठिकाणी कुंपण उभारण्यात आले आहे. याबाबत पंचायतीला माहिती नसल्याचा धक्कादायक खुलासा सरपंच रामा गांवकर यांनी केला आहे. हा रस्ता पूर्णपणे बेकायदेशीर असून यासाठी कोणत्याही प्रशासकीय खात्याला माहिती नसल्याचे देखील सरपंच गांवकर म्हणाले.

Road between amadgaon and lafde
Goa Health News: ये विश्वजीत राणे का स्टाइल है! आरोग्यमंत्री Action Mode मध्ये; तीन कर्माचाऱ्यांना केले निलंबित

रस्ता बांधण्यासाठी पंचायतीच परवानगी घेतली नसल्याचे गांवकर म्हणाले. याप्रकरणी योग्य कारवाई करण्याची मागणी गांवकर यांनी केली आहे. महाराष्ट्रातून अनेक प्रकारे बेकायदेशीर वाहतूक होण्याची भीती देखील स्थानिकांनी उपस्थित केला. या भागात काही दिल्ली आणि बाहेरच्या राज्यातील नागरिकांनी जमीन खरेदी केल्याचे आहे, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com