Miramar Beach: मिरामार किनाऱ्यावर पर्यटकांची लूट! आईस्क्रीमचा रेट 'डबल'; विक्रेत्यांकडे नाहीत परवाने; Social Media वर संताप

Miramar Beach Icecream News: राज्यात एफडीए विभाग विविध भागांत धडक कारवाया करत असताना पणजीतील मिरामार समुद्रकिनाऱ्यावर विनापरवाना आइस्क्रीम विक्री सुरू असल्याची बाब समोर आली आहे.
Miramar Beach Ice Cream FDA Raid
Miramar Beach Ice Cream FDA RaidDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभाग विविध भागांत धडक कारवाया करत असताना पणजीतील मिरामार समुद्रकिनाऱ्यावर विनापरवाना आइस्क्रीम विक्री सुरू असल्याची बाब समोर आली आहे.

या ठिकाणी १० रुपयांची आइस्क्रीम तब्बल २० रुपयांना विकली जात आहे, म्हणजेच सरळ दुप्पट दराने पर्यटकांची लूट केली जात आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमधून ‘एफडीए’ यावर कारवाई का करत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मिरामार समुद्रकिनाऱ्यावर अनेक ठिकाणी फिरते गाड्या, हातगाड्या आणि थर्मोकोल बॉक्समधून आइस्क्रीम विक्री करण्यात येत आहे. अलीकडच्या काळात या फिरत्या गाड्यांची संख्‍या वाढली आहे. या विक्रेत्यांकडे कोणताही वैध एफडीए परवाना नसल्याचे उघड झाले आहे. एका पर्यटकाने समाजमाध्यमावर यासंदर्भात पोस्टही टाकली आहे.

Miramar Beach Ice Cream FDA Raid
FDA Raid: उत्तर गोव्यात FDA ची धडक कारवाई!! 24 आंब्यांच्या नमुन्यांची तपासणी; अस्वच्छतेमुळे 'म्हापशातील प्रसिद्ध हॉटेल' सील

आपण १० रुपयांची आइसक्रीस खरेदी केली होती, मात्र आपल्याकडून २० रुपये आकारण्यात आले. विक्रेत्याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. या विक्रेत्याकडे कोणताही परवाना नाही, तरीही असे प्रकार सर्रास सुरू आहेत.

Miramar Beach Ice Cream FDA Raid
FDA Raid: 'एफडीए' ॲक्‍शन मोडवर! नावेलीत रेस्टॉरंटवर कारवाई, म्‍हापशात 120 किलो आंबे नष्‍ट

चहा, सामोसे विक्रेते वाढले!

मिरामार किनाऱ्यावर उघड्यावर चहा आणि सामोसा विकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या फिरत्या विक्रेत्यांकडे असलेल्या पदार्थांचा दर्जा तपासल्या जात नाही. त्यामुळे पर्यटकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. दुसरीकडे, मिरामार येथे पर्यटकांची संख्या लक्षात घेता काही विक्रेते दुप्पट दराने आइस्क्रीम विक्री करतात. राज्यभर एफडीए विभागाने बेकायदेशीर खाद्यपदार्थ विक्रीवर कारवाई केली असताना, राजधानीत मिरामारसारख्या प्रमुख पर्यटनस्थळी अजून कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

परवाना नसताना जर विक्री केली जात असेल, तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहेत. त्यांच्याकडील पदार्थांची तपासणी सुद्धा केली जाणार आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यावर निश्चितपणे कारवाई होणार आहे. पदार्थ अधिक दराने विकले जात असतील तर त्याची तक्रारही ग्राहक करू शकतात.

श्वेता देसाई, एफडीए संचालिका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com