Velankanni : वालंकिणी भाविकांसाठी विशेष अतिरिक्त रेल्वे गाड्या

गोव्यातील वालंकिणी भाविकांना या महोत्सवाला उपस्थित राहण्यासाठी आता रेल्वे आरक्षणाची प्रतीक्षा संपणार आहे.
Special Train to Velankanni from Goa
Special Train to Velankanni from GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Velankanni : तामिळनाडू येथील वालंकिणी महोत्सवाला जाण्यासाठी गोव्यातून विशेष अतिरिक्त रेल्वे गाड्यांची सोय करण्यात आली आहे. या रेल्वे गाड्या 27 ऑगस्ट ते 8 ऑगस्टपर्यंत वास्को ते वालंकिणी आणि परत अशा धावणार आहेत. त्यामुळे गोव्यातील वालंकिणी भाविकांना या महोत्सवाला उपस्थित राहण्यासाठी आता रेल्वे आरक्षणाची प्रतीक्षा संपणार आहे. अनेकांना रेल्वे तिकिटे न मिळाल्याने प्रतीक्षेत राहण्याची पाळी आली होती.

राज्यसभेचे खासदार लुईझिन फालेरो यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्‍विनी वैष्णव यांना ३ ऑगस्टला पत्र पाठवून गोव्यात वालंकिणीचे मोठ्या प्रमाणात भक्त आहेत व त्यांना वालंकिणी महोत्सवासाठी जाण्यास रेल्वेची तिकिटे मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे गोव्यातून वालंकिणीला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ करण्याची विनंती खासदर लुईझिन फालेरो यांनी केली होती. तीन गाड्या सुरू करण्यात आल्याची माहिती केंद्रीयमंत्र्यांनी खासदार फालेरो यांना कळविली आहे.

Special Train to Velankanni from Goa
Goa Crime : सुऱ्‍याच्या धाकाने पर्यटकांना लुबाडण्याचा प्रकार उघडकीस

अशा धावणार रेलगाड्या

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी गोव्यातील वालंकिणी भाविकांसाठी ज्या विशेष अतिरिक्त रेल्वे गाड्या मंजूर केल्या आहेत, त्यात 27 ऑगस्ट रोजी वास्को ते वालंकिणी व 28 रोजी वालंकिणी ते वास्को, 2 ऑगस्ट वास्को ते वालंकिणी व 4 ऑगस्ट वालंकिणी ते वास्को व 6 ऑगस्ट वास्को ते वालंकिणी व 8 ऑगस्ट वालंकिणी ते वास्को अशा या गाड्या धावणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

home minister amit shah reviews goa st reservation file
mormugao port goa coal import cargo handling capacity
diksha parwadkar accident
dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com