Uddesh Naik Dessai Appointed as Goa Forward students department head
Uddesh Naik Dessai Appointed as Goa Forward students department headDainik Gomantak

कुंकळ्ळीचे नगरसेवक उद्देश नाईक देसाई गोवा फॉरवर्डच्या विद्यार्थी विभागाचे अध्यक्ष

गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी सोपवला पदभार
Published on

मडगाव : कुंकळ्ळी पालिकेचे नगरसेवक उद्देश नाईक देसाई यांची गोवा फॉरवर्ड पक्षाच्या विद्यार्थी विभागाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी त्यांना आज हा पदभार दिला.

Uddesh Naik Dessai Appointed as Goa Forward students department head
कदंबच्या नव्या अध्यक्षांसमोर समस्यांचं मोठं आव्हान

गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी हा नियुक्ती आदेश जाहीर केला. देसाई हे युवा नेते असून कुंकळ्ळी नगरपालिकेचे ते सर्वात लहान वयाचे नगरसेवक आहेत. देसाई यांची गोव्याप्रति पूर्ण निष्ठा असून त्यांची विचारसरणी आणि शक्ती गोव्यातील विद्यार्थी वर्गाला निश्चितच पुढे नेईल असा विश्वास गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे.

Uddesh Naik Dessai Appointed as Goa Forward students department head
मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी ‘स्टार्टअप’शी साधला संवाद

उद्देश देसाई यांनी हा पदभार स्वीकारताना अध्यक्षांच्या अपेक्षा आपण निश्चितच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. हा पदभार देण्याचा समारंभ आज मडगावातील गोयकार घरात झाला. यावेळी गोवा फॉरवर्डच्या पर्यावरण आघाडीचे विकास भगत हेही उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com