पणजी: पणजी मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी डावलल्याने नाराज झालेले माजी महापौर उदय मडकईकर यांनी अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांना दिलेल्या पाठिंब्यावर आपण ठाम असल्याचे महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना ठणकावून सांगितले. त्यामुळे पटोले यांना मडकईकर यांची नाराजी दूर करून त्यांना काँग्रेसच्या पणजीतील उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी राजी करण्यात अपयश आले. (Uday Madakaikar insists on Utpal Parrikar support for Goa Assembly Election)
पटोले यांनी काल संध्याकाळी मडकईकर यांची त्यांच्या भाटले येथील निवासस्थानी भेट घेतली. उदय यांच्या नाराजीचा फटका पणजीतील काँग्रेस (Goa Congress) उमेदवाराला बसणार असल्याने पटोले यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. यावेळी कॉंग्रेसच्या प्रचारासंदर्भात विचारले असता पटोले म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या साखळीत लोकांचा रोष आहे. लोकांनी राज्यात बदल घडवण्याचे ठरविले आहे. काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्यावर त्यांनी पक्षांतर करणार नाही, याची खात्री लोकांना देण्यासाठी उमेदवारांना धार्मिक स्थळांवर जाऊन त्यांना शपथबद्ध केले. पंजाबप्रमाणे गोव्यातही जनतेने भाजपला घरी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
पणजीत (Panjim Constituency) मी उत्पलना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांचा मला विश्वासघात करायचा नाही. मी काँग्रेसचाच कार्यकर्ता आहे. मी ताळगाव, सांताक्रुझ या मतदारसंघांतील काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करणार आहे. पणजीत काँग्रेसने प्रचार सुरू केला होता. मात्र, ज्याचा या मतदारसंघाशी काहीच संबंध नाही, त्याला उमेदवारी दिली.
- उदय मडकईकर, माजी महापौर
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.