मये परिसरात जलवाहिनी फुटण्याचे प्रकार चालूच

मयेत अधूनमधून वेगवेगळ्या भागात जलवाहिनी फुटत आहे.
 water wasted
water wastedDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: मये भागात जलवाहिनी फुटण्याचे प्रकार चालूच असून दिवसेंदिवस ही समस्या गंभीर बनत आहे. जलवाहिनी फुटली की नळाद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याने विशेषत गृहिणींना समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सध्या गावकरवाडा आणि आदिनाथ मठ मिळून दोन ठिकाणी जलवाहिनी फुटून पाण्याचा अपयव्य चालू आहे. गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून मये भागात अधूनमधून वेगवेगळ्या भागात जलवाहिनी फुटत आहे.

 water wasted
कामुर्लीतही रेतीचा उपसा!

मये भागात नव्याने जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र, ही जलवाहिनीही फुटत आहे. बेदरकार खनिज वाहतुकीमुळे ही समस्या उद्भवत आहे. फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष होत आहे अशी नागरिकांची तक्रार आहे.

जलवाहिनी पुन्हा फुटली

तब्बल महिनाभर बंद असलेली खनिज वाहतूक दोन दिवसांपासून पुन्हा सुरू झाली आहे. खनिज वाहतूक सुरू होताच पुन्हा जलवाहिनी फुटण्याचे प्रकार चालू झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com