गोवा विद्यापीठात संस्कृत विषयात लवकरच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू होणार आहे. शालेय अभ्यासक्रमात संस्कृतचे शिक्षण घेतलेल्या आणि भाषेचे मूलभूत ज्ञान असलेला कोणताही पदवीधर विद्यार्थी या संस्कृत एमएच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकेल. असे कुलगुरू हरिलाल मेनन यांनी सांगितले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.
(Masters In Sanskrit At Goa University)
विद्यापीठाच्या स्कूल ऑफ संस्कृत अँड इंडिक नॉलेज सिस्टीम्सद्वारे हा अभ्यासक्रम घेतला जाईल. तसेच, आयुर्वेद विषयात देखील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची योजना आहे. गोवा विद्यापीठाने संस्कृत MA साठी प्राध्यापकांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
नुकतेच गोव्यात भारतीय आयुर्वेद संस्था सुरू करण्यात आली आहे. पेडण्यात झालेल्या या संस्थेचे डिंसेबरमध्ये उद्घाटन झाले आहे. संस्कृत आणि आयुर्वेदातील शिक्षण या विषयातील संशोधन आणि अभ्यासाला अधिक मदत करेल असे मेनन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कुंडई मठाची श्री ब्रह्मानंद संस्कृत प्रबोधिनी 2017 पासून संस्कृतमध्ये पदवीधर अभ्यासक्रम पुरवते. गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी 2014 च्या अर्थसंकल्पात राज्यात संस्कृत महाविद्यालय सुरू करणार असल्याचे सांगितले होते. संस्कृत भाषेत शिक्षण देण्यासाठी संस्कृत महाविद्यालयाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच, योगा आणि संस्कृत भाषा भारतीय संस्कृती आणि शिक्षणाचे महत्वाचे पिलर असल्याचे त्यांनी म्हटले होते.
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात शास्त्रीय भाषेतील साहित्य, कविता आणि तत्त्वज्ञानाचा समावेश असेल, तर भारतीय ज्ञान प्रणाली आधुनिक काळातील भारत तसेच आसपासच्या प्रदेशांचा समावेश असलेल्या प्राचीन भारतीय संस्कृतीच्या ग्रंथ, परंपरा आणि विश्लेषणात्मक प्रणालींच्या अभ्यासाशी संबंधित आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.