Covid-19 Updates: गोव्यात कोरोनाचा धोका कायमच

गोव्यात गेल्या चोवीस तासात दोन रूग्णांचा कोरोनामुळेे मृत्यू झाला.
Goa Covid-19 Updates
Goa Covid-19 UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात (Goa) मागील दोन दिवस कोरोना (Covid-19) बाधित रुग्णांची संख्या शून्य होती मात्र गेल्या चोवीस तासात दोघांचा मृत्यू झाला आहे तर नवीन 88 बाधित रुग्ण सापडले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.59 टक्के झाले आहे. राज्यात बाधितांची संख्या एक हजारापेक्षा कमी (993) असली तरी अजूनही धोका टळलेला नाही. तिसऱ्या लाटेसाठीची तयारी सरकारने ठेवली आहे. सध्या राज्यात तीन महिन्यांपासून राज्यस्तरीय कर्फ्यू लागू आहे.

Goa Covid-19 Updates
Goa : कॅन्‍सर इस्‍पितळासाठी २७० कोटी मंजूर

गेल्या चोविस तासात राज्यभरात 5229 लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात 88 जण कोरोना बाधित सापडले. त्यातील 17 जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे व 71 जणांनी गृह अलगीकरण स्वीकारले आहे.

डोस घेणारे वाढले...

गुरुवारी दिवसभरात 1878 जणांनी पहिला, 2035 जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला. त्यामुळे हळूहळू दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. काल उशिरा नोंद झालेल्या माहितीनुसार 741 जणांनी पहिला तर 528 जणांनी दुसरा डोस घेतला त्यामुळे एकूण 6082 जणांनी लसीकरण केले. आतापर्यंत 7 लाख 68 हजार 776 जणांनी पहिला डोस तर दोन्ही डोस घेतल्यांची संख्या 3 लाख 13 हजार 372 वर गेली आहे. एकूण 13 लाख 95 हजार 530 लसी देण्यात आल्या असून सरकारकडे अजून 8 लाख 86 हजार 930 लसी आहेत. गोव्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत 21 लाख 80 हजार 380 लसीचे डोस दिले आहेत.

Goa Covid-19 Updates
Goa: भाऊसाहेब बांदोडकर हे अनाथांचे आधारस्तंभ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com