Goa Crime: दोन अल्पवयीन मुलींवर दोघा परप्रांतीयांंचा बलात्कार; एक संशयित बंगालचा तर दुसरा कर्नाटकचा

रायबंदर, मडगावात गुन्हे नोंद
Sexual Assault Cases in Ribandar and Margao
Sexual Assault Cases in Ribandar and Margao Dainik Gomantak

Goa Police: राज्यात दोन अल्पवयीन मुलींवर दोघा परप्रांतीयांनी बलात्कार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायबंदर आणि मडगाव येथे हे गुन्हे घडले आहेत.

दोन्ही ठिकाणी स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. तथापि, अद्याप संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

Sexual Assault Cases in Ribandar and Margao
North Goa: उत्तर गोव्यात आता कोणताही रस्ता खोदता येणार नाही; 'या' तारखेपासून अंमलबजावणी

पीडीत मुलींनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली होती. एनजीओंच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत या पीडीत मुलींचा जबाब पोलिसांनी नोंदवला होता. सध्या पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.

रायबंदर येथील घटनेत मंजुनाथ रमेश अथोले (20) याने पीडित मुलीला लग्नाचे आणि इतर आमिषे दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबतची तक्रार मुलीने महिला पोलिस स्थानकात बुधवारी दाखल केली होती.

संशयित मंजुनाथ हा मूळचा हवेरी-कर्नाटक येथील असून सध्या तो रायबंदर येथे वास्तव्यास होता.

Sexual Assault Cases in Ribandar and Margao
Land Grabbing Case: दवर्ली जमीन हडप प्रकरणातील फरार संशयीत सलीम दोडामणी याला अटक

तर दुसऱ्या घटनेत माजोर्डा येथील अल्पवयीन मुलीवर संशयित राहुल चंद्रा (28) याने मडगावात एका फ्लॅटमध्ये अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यातून पीडीत मुलगी गरोदर राहिली होती.

हा प्रकार उघडकीस आल्याने तिच्या आईने मडगाव पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. संशयित राहुल हा मूळचा पश्‍चिम बंगाल येथील आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com