Drowning Death: सुटीत मावशीकडे आलेल्या ऋग्वेदवर काळाचा घाला, 6 वर्षांच्या मावसभावासह दोघांचा बुडून मृत्यू

Two children drown in Talpona river: ११ वर्षीय ऋग्वेद नाईक याचा सहा वर्षांच्या मावसभावासोबत वझरे येथे तळपण नदीत पोहताना बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी घडली.
Two children drown in Talpona river
Two children drown in Talpona riverDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: उन्हाळी सुटीमध्ये श्रीस्थळ-भाटपाल येथे मावशीकडे आलेल्या ११ वर्षीय ऋग्वेद नाईक याचा सहा वर्षांच्या मावसभावासोबत वझरे येथे तळपण नदीत पोहताना बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी घडली.

सविस्तर माहिती अशी, की कारवार येथील ऋग्वेद नाईक हा उन्हाळी सुटीनिमित्त आपल्या श्रीस्थळ-भाटपाल, धुप्यामळ येथील मावशीकडे राहण्यासाठी आला होता. शनिवारी दुपारी ऋग्वेद हा मावशीचा मुलगा ध्रुव वडार (वय ६ वर्षे) आणि आणखी एका मुलासह दुपारी १२ वाजता पोहण्यासाठी वझरे येथे तळपण नदी परिसरात गेले होते. येथे बंधारा आहे.

Two children drown in Talpona river
Cycling Association of Goa: सायकलिंग असोसिएशनला कोर्टाचा झटका! 66 जणांचे सदस्यत्व वैध; 'मतदार वाढतील' हे कारण ठरले आक्षेपार्ह

मात्र, या बंधाऱ्यात खोल डोह आहेत. पोहताना ऋग्वेद आणि ध्रुव या दोघांचा खोल डोहात अचानक तोल गेला आणि ते पाण्यात बुडाले. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या तिसऱ्या मुलाने आपले दोन मित्र पाण्यात पडल्याचे पाहून धावत जाऊन या प्रकाराची माहिती नातेवाईकांना दिली.

Two children drown in Talpona river
Goa Fishing Industry: मच्छीमारी व्यवसाय संकटात! परप्रांतीय ट्रॉलर्सचा धुडगूस सुरूच; कारवाईत हवे सातत्‍य

त्यानंतर नातेवाईकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन त्या दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढले. याची माहिती समजल्यानंतर अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे कारवार येथील ऋग्वेद नाईक आणि ध्रुव वडार यांच्या नातेवाईकांवर आभाळ कोसळले असून परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही मुलांचे मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी इस्पितळात पाठविले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com